८४ गावांच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या
By Admin | Updated: July 31, 2016 00:21 IST2016-07-31T00:21:24+5:302016-07-31T00:21:24+5:30
आमगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत गेल्यावर्षीच्या दुष्काळग्रस्त ८४ गावातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरकारी मदत

८४ गावांच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या
संजय पुराम : सभागृहात केली मागणी
देवरी : आमगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत गेल्यावर्षीच्या दुष्काळग्रस्त ८४ गावातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरकारी मदत देवून शेतकऱ्यांना दिलासा द्या, अशी मागणी आ. संजय पुराम यांनी विधानसभेत केली.
विशेष म्हणजे मागील वर्षी पावसाअभावी आमगाव विधानसभा क्षेत्रातील ८४ गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली होती. त्या गावांना शासनाने अद्याप कोणतीच मदत दिली नाही. पिक विम्याची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. वरुन आता खरीप हंगामाची सुरुवात झाली असून पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने तो ते दररोज बँकेच्या चकरा मारत आहेत.
बँकांच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या दिलासा देण्याची मागणी त्यांनी विधानसभेत केली. शासनाकडून मदत व पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी त्यांनी केली. त्या अनुषंगाने त्यांनी राज्याचे प्रधान सचिव यांना पत्र दिले. यावर शासनाची मदत लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले असल्याचे आ.पुराम यांनी कळविले.
गेल्यावर्षी जिल्ह्यात देवरी तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे खरीपच नाही तर रबी हंगामातही शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. तरीही त्यांना मदत मिळाली नाही.