वादळी पावसाने परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:16+5:30

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास महागाव सिरोली परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. जवळपास २० ते २५ मिनिटे वादळी वाºयासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. तर काही घरावर झाडांची पडझड झाल्याने घरांचे नुकसान झाले आहे. काही घरांवरील टिनाचे छत उडून गले. परिणामी अनेक गोठ्यांची पडझड झाली. बीएसएनएलचे टॉवर कोसळल्याने हरि कोहाडकर यांच्या घराचे छत पूर्णपणे कोसळल्याने त्यांचे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.

Heavy rains cause heavy damage to the area | वादळी पावसाने परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान

वादळी पावसाने परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान

Next
ठळक मुद्देघरांची पडझड । सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील महागाव, सिरोली परिसरात शुक्रवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. तर अनेक नागरिकांच्या घरावरील छत उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे.
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास महागाव सिरोली परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. जवळपास २० ते २५ मिनिटे वादळी वाºयासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. तर काही घरावर झाडांची पडझड झाल्याने घरांचे नुकसान झाले आहे. काही घरांवरील टिनाचे छत उडून गले. परिणामी अनेक गोठ्यांची पडझड झाली. बीएसएनएलचे टॉवर कोसळल्याने हरि कोहाडकर यांच्या घराचे छत पूर्णपणे कोसळल्याने त्यांचे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. तर गावातील इतर नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवपाल नेवारे यांच्या घरावर टॉवरची प्लेट पडल्याने यात घरातील दोन व्यक्ती जखमी झाल्याने असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. तर वादळी वाºयामुळे विद्युत तारा तुटल्याने या भागातील विद्युत पुरवठा सुध्दा खंडित झाला होता. एकंदरीत वादळी वारा व पावसामुळे महागाव व सिरोली परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे याचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

 

Web Title: Heavy rains cause heavy damage to the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस