क्लोरोफिनच्या गोळ्या खाऊन आरोग्य सेविकाची आत्महत्या
By Admin | Updated: March 19, 2017 00:29 IST2017-03-19T00:29:56+5:302017-03-19T00:29:56+5:30
तालुक्यातील घोनाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सिरानडोह उपकेंद्रांतर्गत कार्यरत आरोग्य सेविका रेखा शिंदे (गोफने) यांनी क्लोरोफीन गोळ्यांचे ....

क्लोरोफिनच्या गोळ्या खाऊन आरोग्य सेविकाची आत्महत्या
देवरी : तालुक्यातील घोनाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सिरानडोह उपकेंद्रांतर्गत कार्यरत आरोग्य सेविका रेखा शिंदे (गोफने) यांनी क्लोरोफीन गोळ्यांचे अत्याधिक सेवन करुन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताची आहे.
प्राप्त माहितीनुसारस, आरोग्य सविका रेखा शिंदे (गोफने) बऱ्याच वर्षापासून घोनाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत होत्या. शनिवारला (दि.१८) घोनाडीला मिटिंगसाठी गेल्या होत्या. तिथे अत्याधिक गोळ्याचे सेवन केल्यानंतर प्रकृती बिघडली असता चिचगड ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारात सुधारणा न झाल्याने गोंदिया येथे रेफन करताना रस्त्यातच मृत्यू झाला. देवरी येथे ग्रामीण रुग्णालयात आणले असता रुग्ण वाहिकेत डॉ. भोंगाडे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
विशेष म्हणजे सदर आरोग्य सेविकेला दीड वर्षाची मुलगी असून पती अजुन गोफने अरुणनगर (मोरगाव अर्जुनी) येथे जि.प. प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या आरोग्य सेविकेला काही वर्षापूर्वी तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडून मानसिक त्रास झाल्याने व पैशाची मागणी केल्याने त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी नागपुरे यांची लाचलूचपत विभागाकडे तक्रार करुन त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली होती.
आरोग्य सेविका रेखा शिंदे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलीस तपास करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)