आरोग्य हीच माणसाची खरी संपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST2021-02-05T07:49:34+5:302021-02-05T07:49:34+5:30
सालेकसा : आपले आरोग्य उत्तम राहणे हेच आज गरजेचे आहे. आरोग्य उत्तम, तरच सर्वकाही उत्तम राहते, अन्यथा अन्य सर्व ...

आरोग्य हीच माणसाची खरी संपत्ती
सालेकसा : आपले आरोग्य उत्तम राहणे हेच आज गरजेचे आहे. आरोग्य उत्तम, तरच सर्वकाही उत्तम राहते, अन्यथा अन्य सर्व सुखसोयी असूनही त्यांचा काहीच उपयोग नाही. आरोग्य हीच माणसाची खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन टिना चुटे यांनी केले. गोटुल आदिवासी संस्थेच्या वतीने अतिशय दुर्गम भागातील ग्रामपंचायत बीजेपार अंतर्गत ग्राम सेरपार येथे आयोजित नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
दीपप्रज्वलन टिना चुटे यांच्या हस्ते तर उद्घाटन संस्थेच्या अध्यक्ष वंदना मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ता देवराम चुटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रोजगार सेवक राजकुमार मेश्राम, राहुल हटवार, उकरे उपस्थित होते. शिबिरात मोठ्या संख्येत नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करवून घेतली. संचालन फुंडे यांनी केले. आभार सतिश अंभोरे यांनी मानले.