कोरंभी येथील कंटेन्मेंट झोनची आरोग्य अधिकाऱ्यांनी केली पाहणी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:28 IST2021-04-21T04:28:58+5:302021-04-21T04:28:58+5:30
बाराभाटी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंभी येथील कोविड केअर सेंटर आणि कंटेन्मेंट झोनला सोमवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन ...

कोरंभी येथील कंटेन्मेंट झोनची आरोग्य अधिकाऱ्यांनी केली पाहणी ()
बाराभाटी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंभी येथील कोविड केअर सेंटर आणि कंटेन्मेंट झोनला सोमवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
आरोग्य संचालक डाॅ. अर्चना पाटील, उपसंचालक डॉ. सतीश पवार, उपसंचालक डॉ. जायस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र कोरंभी, कोविड केअर सेंटर व कंटेन्मेंट झोन अर्जुनी मोरगावची पाहणी करुन त्वरित ऑक्सिजनचा पुरवठा करा, शंभर बेडचे कोविड केंद्र तयार करा, आदी सूचना जिल्हा आरोग्य विभाग व तालुका आरोग्य अधिकाऱ्यास करण्यास सांगितले. यावेळी तालुक्यातील कोरोना नोडल अधिकारी डाॅ. सुरेंद्र खोब्रागडे, डाॅ. दिनेश बारसागडे, डाॅ. घरतकर व डाॅ. अकीनवार तसेच आशा वर्कर्स उपस्थित होत्या.
.....
शंभर बेडचे कोविड केअर सुरु करणार
काेरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता याठिकाणी शंभर बेडची आवश्यकता आहे. तसेच प्रत्येक कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजन सेवेचा चांगला लाभ द्यावा, कोणत्याही परिस्थितीत नागरिक दुरुस्त झाले पाहिजे, आरोग्य विभागाने उत्तम सेवा द्यावी हेच अपेक्षित आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या असल्याचे आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.