गर्भवती माता व बालकांची आरोग्य तपासणी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST2021-09-15T04:34:12+5:302021-09-15T04:34:12+5:30

बोंडगावदेवी : ग्राम चान्ना बाक्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने मानव विकास कार्यक्रमांतर्गत सॅम, मॅम, कुपोषित बालकांचे आरोग्य तसेच गरोदर ...

Health check-up for pregnant mothers and children () | गर्भवती माता व बालकांची आरोग्य तपासणी ()

गर्भवती माता व बालकांची आरोग्य तपासणी ()

बोंडगावदेवी : ग्राम चान्ना बाक्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने मानव विकास कार्यक्रमांतर्गत सॅम, मॅम, कुपोषित बालकांचे आरोग्य तसेच गरोदर मातांची तपासणी शिबिर घेण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी श्वेता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवून परिसरातील गरजू सामान्यजनांना शासनाच्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमितपणे शिबिर घेण्यात येत आहे. ग्रामीण भागातील गरोदर मातांची नियमित तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करून औषधोपचार मोफत करण्यासाठी तज्ज्ञ महिला वैद्यकीय अधिकाऱ्यास बोलाविण्यात येते. कुपोषित बालकांना औषधोपचार करून बालरोग तज्ज्ञास खास निमंत्रित करण्यात येत आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज डोंगरवार यांच्याहस्ते कुपोषित तसेच बालकांची तपासणी करून औषधांचे वाटप करण्यात आले. शिबिरामध्ये गर्भवती मातांची तपासणी करून नियमित औषधे वितरित करण्यात आली.

वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Health check-up for pregnant mothers and children ()