तिरोडा बस आगारामध्ये आरोग्य तपासणी शिबिर व स्वागत

By Admin | Updated: June 2, 2016 01:21 IST2016-06-02T01:21:22+5:302016-06-02T01:21:22+5:30

स्थानिक एसटी आगारामध्ये एसटी महामंडळाला ६८ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आरोग्य शिबिर घेण्यात आले.

Health check-up camp and welcome to Tiroda Bus Agra | तिरोडा बस आगारामध्ये आरोग्य तपासणी शिबिर व स्वागत

तिरोडा बस आगारामध्ये आरोग्य तपासणी शिबिर व स्वागत

६८ वा वर्धापन दिन : प्रवाशांचे पुष्पगुच्छांनी केले स्वागत
तिरोडा : स्थानिक एसटी आगारामध्ये एसटी महामंडळाला ६८ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आरोग्य शिबिर घेण्यात आले.
उद्घाटन डॉ. जुगलकिशोर लढ्ढा यांच्या हस्ते, आगार व्यवस्थापक किरण चोपकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक गिरीपुंजे, पत्रकार रमाकांत खोब्रागडे, डॉ. प्रणव डोंगरे, नीलेश लेखी, डॉ. श्रद्धांजली चौधरी, दीपक रणदिवे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आगारातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. एस.टी. ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आगराच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांचे आरोग्य कसे असावे, त्यासाठी कोणती काळजी घ्यावी, यावर डॉ. जुगलकिशोर लढ्ढा यांनी मार्गदर्शन केले. तर एस.टी.ने प्रवास व इतर वाहनाने प्रवास यात नेमका कोणता फरत आहे, एस.टी.चा प्रवास कसा सुरक्षित व आरामदायी आहे, यावर आगार व्यवस्थापक चोपकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच दीपक गिरीपुंजे यांनी एस.टी. चा प्रवास हा सुरक्षित असून अपघात झाल्यास विम्याचे संरक्षणही असते, असे सांगितले.
संचालन भांडार लिपीक ए.डब्ल्यू. बडोले यांनी केले. आभार अमित उरकुडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सहा. वाहतुक नियंत्रक आर.डी. नंदनवार, मोहम्मद आरीफ, दिलीप बन्सोड, दीपक कच्छवाह, सी.पी. लोंदासे, आगार सचिव शिवकुमार कनोजे, गणेश आळे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Health check-up camp and welcome to Tiroda Bus Agra