‘तो’ खून घरगुती भांडणातून
By Admin | Updated: April 28, 2017 01:46 IST2017-04-28T01:46:46+5:302017-04-28T01:46:46+5:30
घाटकुरोडा येथील वामन देवराव हटवार (२८) याने पत्नी रुपाली वामन हटवार (२६) हिला घरघुती कारणावरुन

‘तो’ खून घरगुती भांडणातून
पैशासाठी तगादा : बाळंतपणासाठी दाखला घेण्यास आली असताना मारले
तिरोडा : घाटकुरोडा येथील वामन देवराव हटवार (२८) याने पत्नी रुपाली वामन हटवार (२६) हिला घरघुती कारणावरुन मारपीट करुन कुऱ्हाडीच्या दांड्याने डोक्याला मारल्याने ती गंभीर जखमी होऊन मरण पावली. तिला मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पती वामन हा रुपालीवर वारंवार मोहाडी येथे जातेस असे म्हणून तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातूनच त्याने हा खून केल्याची चर्चा आहे.
रुपालीला १६ महिन्यांची मुलगी असून सध्या सात महिन्याची गर्भवती आहे. घटनेपूर्वी रुपाली स्वत:च्या आईवडीलाकडे राहत होती. ती घरघुती भांडणातून ११ फेब्रुवारी २०१७ ला प्रथमत: एकटीच मोहाडी येथे गेली. त्याच दिवशी सायंकाळी आई-वडीलांसोबत येवून लहान मुलीला घेवून गेले तेव्हापासून ती माहेरीच होती.
तिला डिलेवरीकरिता रहिवासी दाखल्याची आवश्यकता असल्याने ती एकटीच घाटकुरोडा येथे आली. ग्रामसचिवाकडून रहिवासी दाखला प्राप्त केला. सरपंचांना सुद्धा भेटली. कागदपत्रासाठी स्वत:च्या घरी गेली. त्या वेळेस घरी कुणीच नव्हते. चाबी ठरलेल्या ठिकाणी असते हे माहित असल्याने दार उघडून कागदपत्रे पाहत असता पती आले. त्यांच्यात तोंडातोंडी वाद झाला. त्यातच पतीने कुऱ्हाडीच्या दांडाने डोक्यावर मारले. तिला मुंडीकोटा येथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पतीचे आई-वडील-बहीण हे त्याला सहकार्य करीत असून खोट्या गोष्टीत साथ देत होते असा आरोप मुलीची आई फिर्यादी सुनंदा मनोहर पाटील मोहाडी यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कलम ४२८ (अ) ३०४ ब, ३०२, ३४ अन्वये मुख्य आरोपी वामन हटवार यांना अटक केली. पोलिसांनी कोर्टात हजर करुन २९ एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी प्राप्त केली. (तालुका प्रतिनिधी)