‘तो’ बिबट अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST2020-01-08T06:00:00+5:302020-01-08T06:00:19+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाºया बाक्टी-चान्ना येथील श्रीराम मेश्राम यांच्या स्नानगृहात मंगळवारी बिबट्याने सकाळी ६ वाजतापासून ठाण मांडले होते. बाक्टी-चान्ना हे गाव जंगलव्याप्त, पहाडी परिसराला लागून आहे. मागील काही दिवसांपासून बाक्टी परिसरातील सोमलपूर, मुढंरी, इंजोरी, चान्ना, येरंडी परिसरात वाघाने धुमाकुळ घातल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत.

‘तो’ बिबट अखेर जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : जवळील ग्राम बाक्टी-चान्ना येथील श्रीराम मेश्राम यांच्या स्नानगृहात मंगळवारी (दि.७) सकाळी ६ वाजतापासून एका बिबट्याने ठाण मांडले होते. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना ७ तासांच्या परिश्रमानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. दुपारी १ वाजताच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाºया बाक्टी-चान्ना येथील श्रीराम मेश्राम यांच्या स्नानगृहात मंगळवारी बिबट्याने सकाळी ६ वाजतापासून ठाण मांडले होते. बाक्टी-चान्ना हे गाव जंगलव्याप्त, पहाडी परिसराला लागून आहे. मागील काही दिवसांपासून बाक्टी परिसरातील सोमलपूर, मुढंरी, इंजोरी, चान्ना, येरंडी परिसरात वाघाने धुमाकुळ घातल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. चान्ना शेती शिवारात एक बिबट्या नुकताच मृतावस्थेत आढळला होता. येरंडी येथे अलिकडेच वाघाने एका गायीची शिकार केली होती.यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण होते.मागील दोन-तीन दिवसांपासून बिबट्याने बाक्टी गावालगत ठाण मांडले होते. गावकºयांनी याची माहिती वनविभागाला दिली होती. पोलीस पाटील मोतीराम बनकर यांच्या गोठ्यात दोन दिवसांपासून बिबट्याने ठाण मांडले होते.
दरम्यान मंगळवारी सकाळी बिबट्या तिथेच बसला असताना गावकऱ्यांनी पाठलाग करताच त्या बिबट्याने शेजारील श्रीराम मेश्राम यांच्या स्नानगृहाच्या दिशेनी धाव घेऊन तिथे ठाण मांडले. याची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी मेश्राम यांच्या घरी गर्दी केली होती.
वनविभागाचे रॅपीड रिसपॉन्स युनिटचे ११ कमांडो उशिरा गावात पोहचले. सर्वप्रथम त्यांनी स्थानगृहात ठाण मांडून बसलेल्या बिबट्याची पाहणी केली. यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाय योजना सुरू केली. कमांडोनी स्नानागृहाच्या वरच्या भागातून बिबट्याची हालचाल पाहिली. बिबट्या मोठा असल्याने जाळ्यात पकडणे कठिण जाईल ही बाब त्यांच्या लक्षात आली. रॅपीड रिसपॉन्स युनिटच्या कमांडोनी जेरबंद करण्याचे शर्तीचे प्रयत्न केले.स्नानगृहाला जाळ्याचे आच्छादन करण्यात आले. परंतु तो बिबट चवताळून हल्ला करु शकतो. त्यामुळे दुपारी १ वाजताच्या सुमारास पशु चिकित्सकांना व वरिष्ठांना घटनास्थळी बोलवून स्नानगृहात दडी मारुन बसलेल्या बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन पिंजºयात जेरबंद करण्यात आले. यानंतर गावकºयांनी सुटकेचा निश्वास सोडला.
तीन-चार दिवसांपासून होता बिबट्याचा वावर
बाक्टी-चान्ना हा परिसर जंगलव्याप्त असून या परिसरात मागील तीन चार दिवसांपासून बिबट्याने ठाण मांडले होते. यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याच्या दहशतीमुळे गावकºयांनी रात्रीच्या वेळेस बाहेर पडणे देखील टाळले होते. अखेर मंगळवारी दुपारी बिबट्याला जेरबंद केल्यानंतर गावकºयांना दिलासा मिळाला.