पत्नीला मारहाण करून मुलीला हिसकावून नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:24 IST2021-07-25T04:24:29+5:302021-07-25T04:24:29+5:30

गोंदिया : तालुक्यातील ग्राम खमारी येथील माधुरी रामकृष्ण वंजारी (वय २८) या विवाहितेला तिच्या पती व इतर तिघांनी मारहाण ...

He beat his wife and snatched her | पत्नीला मारहाण करून मुलीला हिसकावून नेले

पत्नीला मारहाण करून मुलीला हिसकावून नेले

गोंदिया : तालुक्यातील ग्राम खमारी येथील माधुरी रामकृष्ण वंजारी (वय २८) या विवाहितेला तिच्या पती व इतर तिघांनी मारहाण करून मोठ्या मुलीला हिसकावून आमगाव तालुक्यातील ग्राम ठाणा येथे नेले. ही घटना २२ जुलैरोजी सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान घडली. यासंदर्भात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौटुंबिक वादामुळे माधुरी व रामकृष्ण हे वेगवेगळे राहतात. माधुरी आपल्या माहेरी खमारी येथे दोन मुलींना घेऊन राहत आहे. रामकृष्ण प्रमोद वंजारी (३२) याने दुसरे लग्न केले. त्यामुळे माधुरीने हे प्रकरण न्यायालयात टाकले आहे. २२ जुलैरोजी सायंकाळी ५ वाजता आरोपी रामकृष्ण वंजारी व गोमती जगतपाल बैस (२५, रा. ठाणा) व इतर दोन अनोळखी असे चारजण आले. रामकृष्ण याने ५ वर्षीय मोठ्या मुलीला पकडून नेत असताना, त्याला माधुरीने अडविण्याचा प्रयत्न केला. यात आरोपीने तिला मारहाण केली. तक्रारीवरून चौघांवर २३ जुलैरोजी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३२४, ४२७, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: He beat his wife and snatched her