शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

ब्लास्टिंगमुळे किडंगीपार परिसरातील नागरिकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 6:00 AM

ग्रामपंचायत गोंडमोहाडी, किडंगीपार गट ग्रापंचायत असून किडंगीपार-गोंडमोहाडीचे ४ किमी अंतर आहे. ग्रामपंचायतला जाहीरनामा येण्याच्या आधीच व नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. किडंगीपारच्या नागरिकांना विचारात न घेता नाहरकरत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. शेती लागूनच असल्याने ब्लास्टींग करताना सर्व दगड शेतातील धान पिकात पडतात.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान। खाण बंद करण्याची मागणी, संबंधित विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : तिरोडा तालुक्यातील परसवाडा महसूल मंडळ अंतर्गत किडंगीपार (अर्जुनी) जवळ मे. बरवारी प्रा.लि.रामपूर,छ.ग.यांनी तिरोडा-तुमसर मार्ग तयार करण्यासाठी शेतीची जागा घेतली. त्या ठिकाणी दगड असल्याने खोदकाम सुरु केले आहे.ब्लास्टींग करुन दगड मोठ्या प्रमाणात फोडण्याचे काम सुरु केले.मात्र यामुळे किडंगीपार परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ही खाण बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.खाणीतून हजारो ब्रास दगड फोडून त्यांची प्रोसेसींग करुन २० एमएम, ४० एमएम, ८० एमएम, १० एमएम दगड क्रेसींग करुन तयार केले जाते. किडंगीपार गावापासून फक्त १०० ते १५० मिटर अंतरावर खदान नाल्याच्या किनाºयावर आहे.त्यामुळे शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, शेतात, शेतकरी, महिलांना, प्रवाशांना त्रास करावा लागत असून आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत गोंडमोहाडी, किडंगीपार गट ग्रापंचायत असून किडंगीपार-गोंडमोहाडीचे ४ किमी अंतर आहे. ग्रामपंचायतला जाहीरनामा येण्याच्या आधीच व नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. किडंगीपारच्या नागरिकांना विचारात न घेता नाहरकरत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. शेती लागूनच असल्याने ब्लास्टींग करताना सर्व दगड शेतातील धान पिकात पडतात. घरावरही दगडाचे तुकडे पडतात, घराला भेगाही पडल्या, ब्लास्टींगची तीव्रता अधिक असल्याने झटके लागतात. घरातील भांडी खाली पडतात. यामुळे किडंगीपारवासी मुले, महिला घराच्या बाहेर पडतात. याची तक्रार जिल्हाधिकारी, खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी यांना करण्यात आली. मात्र अद्यापही कुठलीही कारवाही करण्यात आली नाही.अन्यथा आंदोलनाचा इशाराखदान ६० ते ८० फुट खोल असून त्यात ३० ते ४० फुट मशीनने होल करुन ५०० ते ६०० ते होल मारले जाते. ब्लास्टींग करतेवेळी मोठा आवाज होवून दगड १ मी.दूरपर्यंत जाऊन पडतात.यामुळे केव्हाही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किडंगीपार गावातील नागरिक विजय तुरकर व इतर शंभर नागरिकांनी खदान बंद करण्याची मागणी केली आहे. खदान बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.गावकऱ्यांच्या तक्रारी केराच्या टोपलीतखदानीमुळे होत असलेला त्रास व पिकांचे नुकसान होत असल्याने याची गावकऱ्यांनी अनेकदा संबंधीत विभागाकडे केली. मात्र या तक्रारींची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. खनिकर्म विभागाने सुध्दा बघ्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे गावकºयांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली जात असल्याने रोष व्याप्त आहे.

टॅग्स :Blastस्फोट