Hazard to citizens of Kidangipar area due to blasting | ब्लास्टिंगमुळे किडंगीपार परिसरातील नागरिकांना धोका
ब्लास्टिंगमुळे किडंगीपार परिसरातील नागरिकांना धोका

ठळक मुद्देपिकांचे नुकसान। खाण बंद करण्याची मागणी, संबंधित विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील परसवाडा महसूल मंडळ अंतर्गत किडंगीपार (अर्जुनी) जवळ मे. बरवारी प्रा.लि.रामपूर,छ.ग.यांनी तिरोडा-तुमसर मार्ग तयार करण्यासाठी शेतीची जागा घेतली. त्या ठिकाणी दगड असल्याने खोदकाम सुरु केले आहे.ब्लास्टींग करुन दगड मोठ्या प्रमाणात फोडण्याचे काम सुरु केले.मात्र यामुळे किडंगीपार परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ही खाण बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
खाणीतून हजारो ब्रास दगड फोडून त्यांची प्रोसेसींग करुन २० एमएम, ४० एमएम, ८० एमएम, १० एमएम दगड क्रेसींग करुन तयार केले जाते. किडंगीपार गावापासून फक्त १०० ते १५० मिटर अंतरावर खदान नाल्याच्या किनाºयावर आहे.त्यामुळे शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, शेतात, शेतकरी, महिलांना, प्रवाशांना त्रास करावा लागत असून आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत गोंडमोहाडी, किडंगीपार गट ग्रापंचायत असून किडंगीपार-गोंडमोहाडीचे ४ किमी अंतर आहे. ग्रामपंचायतला जाहीरनामा येण्याच्या आधीच व नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. किडंगीपारच्या नागरिकांना विचारात न घेता नाहरकरत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. शेती लागूनच असल्याने ब्लास्टींग करताना सर्व दगड शेतातील धान पिकात पडतात. घरावरही दगडाचे तुकडे पडतात, घराला भेगाही पडल्या, ब्लास्टींगची तीव्रता अधिक असल्याने झटके लागतात. घरातील भांडी खाली पडतात. यामुळे किडंगीपारवासी मुले, महिला घराच्या बाहेर पडतात. याची तक्रार जिल्हाधिकारी, खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी यांना करण्यात आली. मात्र अद्यापही कुठलीही कारवाही करण्यात आली नाही.

अन्यथा आंदोलनाचा इशारा
खदान ६० ते ८० फुट खोल असून त्यात ३० ते ४० फुट मशीनने होल करुन ५०० ते ६०० ते होल मारले जाते. ब्लास्टींग करतेवेळी मोठा आवाज होवून दगड १ मी.दूरपर्यंत जाऊन पडतात.यामुळे केव्हाही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किडंगीपार गावातील नागरिक विजय तुरकर व इतर शंभर नागरिकांनी खदान बंद करण्याची मागणी केली आहे. खदान बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गावकऱ्यांच्या तक्रारी केराच्या टोपलीत
खदानीमुळे होत असलेला त्रास व पिकांचे नुकसान होत असल्याने याची गावकऱ्यांनी अनेकदा संबंधीत विभागाकडे केली. मात्र या तक्रारींची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. खनिकर्म विभागाने सुध्दा बघ्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे गावकºयांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली जात असल्याने रोष व्याप्त आहे.

Web Title: Hazard to citizens of Kidangipar area due to blasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.