आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा

By Admin | Updated: September 28, 2016 01:19 IST2016-09-28T01:19:43+5:302016-09-28T01:19:43+5:30

आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोन ठेवा म्हणजे आत्महत्येची वेळच येणार नाही, असे प्रतिपादन प्राचार्य रिजवाना अहमद यांनी केले.

Have a positive attitude in life | आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा

आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा

रिजवाना अहमद : जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन साजरा
गोंदिया : आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोन ठेवा म्हणजे आत्महत्येची वेळच येणार नाही, असे प्रतिपादन प्राचार्य रिजवाना अहमद यांनी केले.
केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक आरोग्य पथकातर्फे रविवारी जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त केटीएस रुग्णालयात जनजागरण कार्यशाळा घेण्यात आली. यात आपल्या उद्घाटकीय भाषणात ते बोलत होते.
उद्घाटन एस.एम. पटेल ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य डॉ. रिजवाना अहमद यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मीनल भिसे पाटील, मार्गदर्शक डॉ. सुवर्णा हुबेकर, मनोचिकित्सक डॉ. आनंद लाडे, दंतचिकित्सक डॉ. मनीष बत्रा, डॉ. येळणे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक मानसिक आरोग्य पथकाच्या समन्वयक वैशाली थूल यांनी मांडले. १६ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व विविध महाविद्यालयांतून आत्महत्या प्रतिबंध कार्यक्रम जनजागरण अभियान राबविण्यात आल्याची माहिती वैशाली थूल यांनी दिली.
जिल्हा शासकीय परिचर्चा केंद्र येथील प्रशिक्षणार्थी परिचारिकांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अपयशामुळे कसे मानसिक संतुलन बिघडते व मचोचिकित्सकांच्या समुपदेशनामुळे आत्महत्या कशी टाळली जावू शकते, याबाबत एक लघुनाटिका सादर केली.
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मीनल भिसे पाटील यांच्या हस्ते प्राचार्य रिझवाना अहमद यांचा पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पौंगडावस्थेत जास्तीत जास्त मुलींना सकारात्मक समुपदेशन करून करिअरला टर्निंग पार्इंट दिल्याबद्दल व आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे प्राचार्य रिझवाना अहमद यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचा लाभ बहुसंख्य रुग्ण व नातेवाईकांनी घेतला. याप्रसंगी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Have a positive attitude in life