शुभेच्छांच्या आड प्रचार

By Admin | Updated: January 2, 2017 00:43 IST2017-01-02T00:43:27+5:302017-01-02T00:43:27+5:30

नववर्षाचा पहिलाच दिवस असल्याने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या आड नगर परिषद निवडणुकीच्या

Happy Promotions | शुभेच्छांच्या आड प्रचार

शुभेच्छांच्या आड प्रचार

मिरवणुकांनी दणाणले शहर : उमेदवार पोहोचले घरोघरी
गोंदिया : नववर्षाचा पहिलाच दिवस असल्याने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या आड नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी मतरादांची भेटगाठ घेऊन प्रचार करून घेतला. या भेटीगाठीच्या नादात निघालेल्या मिरवणुकांनी शहर दणाणले होते. तर उमेदवार घरोघरी पोहचून नववर्षाच्या शुभेच्छा देत त्या आड आपल्यासाठी मत मागताना दिसले.
रविवार सुटीच्या दिवस असल्याने सर्वच घरी मिळतात. त्यात नववर्षाचा पहिला दिवस सुटीचा आल्याने उमेदवारांनी हीच संधी साधून नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या आड मतदारांच्या भेटीगाठी करून घेतल्या. सुटीचा दिवस असल्याने रिंगणातील उमेदवारांच्या मिरवणुकाच शहरातील प्रत्येकच भागात दिसून येत होत्या. प्रत्येकच उमेदवार नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने मतदारांच्या घरी पोहचत असल्याचेही दिसून आले. तर त्यांच्या या मिरवणुकांनी शहरच दणाणून गेले होते.
यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांसह स्थानिक पक्षांनीही उडी घेतल्याचे दिसत आहे. शिवाय अपक्ष उमेदवारांचीही चांगलीच संख्या असल्याने निवडणूकीत चुरस वाढली आहे.
सर्वच आपापल्या भागात जमलेले असल्याने कोण हात मारेल याचा नेम नाही. करिता जास्त मेहनत करून मतदारांत आपली ओळख निर्माण करण्यासाठी उमेदवारांकडून चकरा मारल्या जात आहेत. एकदा मतदारांच्या नजरेत बसण्यासाठी उमेदवारांची ही धावपळ सुरू आहे. त्यातून भेटीगाठींचे सत्र सुरू आहे.
ठीक सहा दिवसांनी म्हणजेच पूढच्या रविवारी (दि.८) नगर परिषदेची निवडणूक होत आहे. त्यातच नववर्षांची चांगलीच संधी चालून आली व उमेदवारांनी ती ‘कॅश’ ही केली.
नववर्षाच्या शुभेच्छा देण्याचे निमित्त साधत उमेदवारांनी ही प्लानींग केल्याचेही दिसून येत आहे. रविवार सुटीचा दिवस असल्याने मतदारही घरीच भेटल्याने उमेदवारांच्या भेटीगाठीही घडल्या. (शहर प्रतिनिधी)

- सकाळपासूनच दौरे सुरू
नववर्षाचा पहिलाच दिवस व तोही सुटीच्या दिवशीच आल्याने या दिवसभरात प्रभागातील दौरा आटोपण्यासाठी उमेदवार सकाळपासूनच प्रभागात निघाले होते. रविवारची सुटी असल्याने सर्वांची भेट घेण्यासाठी हाच चांगला दिवस होता. पुढच्या रविवारी निवडणुकाच असल्याने हाच रविवार कॅश करण्यासाठी उमेदवारांची धावपळ दिसली. काही उमेदवारांनी तर रॅलीचेच आयोजन केल्याचेही दिसले.
पार्ट्यांचे जोमात आयोजन
३१ डिसेंबर रोजी शनिवार आल्याने व शनिवारी काहींना नॉनवेज जमत नसल्याने ३१ डिसेंबरची पार्टी रविवारी ठरविण्यात आली. रविवारी मनसोक्त आनंद लुटायचा याच हेतूने रविवारी चांगल्याच पार्ट्यांचे आयोजन करण्यात आल्याचेही कळले. सध्या सर्वत्रच पार्ट्यांचे आयोजन उमेदवारांकडून केले जात आहे. हॉटेल, ढाबे व बार मध्ये सध्या निवडणुकांच्याच पार्ट्या सुरू असल्याचेही दिसते. आता मोजकेच दिवस असल्याने पार्ट्यांनाही उधाण येणार आहे.

 

Web Title: Happy Promotions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.