रिमझिम पावसातही पोळ्याचा उत्साह
By Admin | Updated: September 2, 2016 01:42 IST2016-09-02T01:42:14+5:302016-09-02T01:42:14+5:30
सालाबादाप्रमाणे यावर्षीसुध्दा स्थानिक उत्तर बुनियादी शाळेच्या पटांगणावर पोळ्याचे आयोजन करण्यात आले.

रिमझिम पावसातही पोळ्याचा उत्साह
उत्कृष्ट जोडीचा सत्कार : घरोघरी बैलजोडीची पुजा
तिरोडा : सालाबादाप्रमाणे यावर्षीसुध्दा स्थानिक उत्तर बुनियादी शाळेच्या पटांगणावर पोळ्याचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे पोळा ऐन रंगात आला असताना पावसाने हजेरी लावली. त्यानंतर रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र त्यातही शेतकऱ्यांना उत्साहाने हा सण साजरा केला.
तिरोडा शहर बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सच्या वतीने उत्कृष्ट प्रथम ५००१, द्वितीय ३००१ व तृतीय २००१ चे रोख पारितोषीक तसेच घुंगराची माळ व झुली देण्यात आल्या तसेच सर्वच जोडी मालकांना २५१ चे रोख प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
गुरूदेव सेवा मंडळ तिरोडा यांचेतर्फे प्रथम तीन जोडीचा सत्कार करून त्यांना संघटनेच्या वतीने स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पोळ्यामध्ये प्रथम बक्षिस छोटू बिसेन चुरडी यांना ५००१ रु., द्वितीय अनिल बिसन धार्मिक तिरोडा यांना ३००१ रु. तर तृतीय पारितोषिक सोहन राऊत तिरोडा यांना २००१ रु. रोख देवून करण्यात आला. हा सत्कार नगराध्यक्ष अजय गौर यांचे हस्ते खंडविकास अधिकारी एम.एस.मानकर यांचे अध्यक्षतेखाली माजी नगराध्यक्ष राजेश गुणेरिया, मोहन ग्यानचंदानी, माजी पोलीस पाटील बाळकृष्ण दृगकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी ४० जोड्या उपस्थित झाल्याअसून सर्वांना २५१ रु.चे रोख पारितोषिक देण्यात आले. पोळ्याच्या कार्यक्रमाचे संचालन मुकेश अग्रवाल आभार प्रदर्शन पंकज देहलीवाल यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)