विशाल कारंडे याच्या मारेकऱ्यांना फाशी द्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:30 IST2021-05-06T04:30:53+5:302021-05-06T04:30:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बाराभाटी : मुंबईच्या रमाबाई नगर येथील विशाल कारंडे या तरुणाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. ही हत्या ...

Hang the killers of Vishal Karande () | विशाल कारंडे याच्या मारेकऱ्यांना फाशी द्या ()

विशाल कारंडे याच्या मारेकऱ्यांना फाशी द्या ()

लोकमत न्यूज नेटवर्क

बाराभाटी : मुंबईच्या रमाबाई नगर येथील विशाल कारंडे या तरुणाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. ही हत्या करणाऱ्या नराधमांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी आंबेडकरी समाजातील तरुणांनी केली आहे.

विशाल कारंडे याची हत्या ही कट करुन केली गेली. त्याच्या चेहऱ्यावर तेजाब टाकण्यात आले व डोळे फोडून विचित्र निर्घृण हत्या करण्यात आली. विशाल कारंडेच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, ही या तरुणांची मागणी आहे. म्हणूनच विशालच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदार विनोद मेश्राम यांना देण्यात आले. हे निवेदन आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक मुन्नाभाई नंदागवळी, ग्रामपंचायत सदस्य प्रीतम रामटेके, धम्मदीप मेश्राम, मयूर खोब्रागडे, शैलेंद्र बोरकर आदींनी दिले.

Web Title: Hang the killers of Vishal Karande ()