लोकार्पण सोहळ्याच्या अर्ध्या तासात फुटली पाईपलाईन
By Admin | Updated: August 30, 2014 23:52 IST2014-08-30T23:52:34+5:302014-08-30T23:52:34+5:30
ग्रामपंचायतअंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेला विस्तारित करुन नागरिकांच्या हक्काचे पाणी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठ्यातील गावांना देण्याचा राजकिय पुढाऱ्यांचा निर्णय नागरिकांना डोईजड होत आहे.

लोकार्पण सोहळ्याच्या अर्ध्या तासात फुटली पाईपलाईन
आमगाव : ग्रामपंचायतअंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेला विस्तारित करुन नागरिकांच्या हक्काचे पाणी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठ्यातील गावांना देण्याचा राजकिय पुढाऱ्यांचा निर्णय नागरिकांना डोईजड होत आहे. तर लोकार्पण सोहळा आटोपताना अपूर्ण बांधकाम योजनेतील पाणी पुरवठा सुरु केल्याने अर्ध्या तासातच जल वाहिनी फुटून हजारो लीटर पाणी रस्त्यावर वाहण्याचे चित्र दिसून आले.
आमगाव येथील नागरिकांना वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नागरिकांनी शासनाकडे पाठपुरावा केला. शासनाने आमगावला पाठीव पाणी पुरवठा मंजूर केला. परंतु या योजनेचे राजकारण करण्यासाठी राजकिय पुढारी नागरिकांचे हक्काचे पाणी पळवित असल्याने आता नागरिकांना हा निर्णय डोईजड होत आहे.
आमगाव येथील नागरिकांच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने जुनी स्वतंत्र पाणी पुरवठा ही कालबाह्य झाली आहे. पाणी पुर्ततेसाठी साठवण जलकुंभ कमी क्षमतेचे असल्याने दररोज लागणारे पिण्याचे पाणी समाधानकारक मिळत नाही. जुने कालबाह्य ठरलेली जलकुंभ जमिनदोस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे पुर्वीच जलकुंभाची कमतरता असल्याने वाढीव पाणी पुरवठा योजनेतील जलकुंभ थोडे समाधान करणारे आहे. परंतु नवीन आमगाव वाढीव पाणी पुरवठा योजना रखडत चालणाऱ्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला समाविष्ठ करण्याचा प्रयत्न काही राजकिय पुढाऱ्यांनी पुढे केला आहे.
आमगाव येथे राजकिय दडपण वापरुन स्वतंत्र असलेली पाणी पुरवठा योजना बनगावला समाविष्ठ करण्याचे काय युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे आमगाव येथील नागरिकांना पाण्यासाठी समस्यांना समोर जावे लागणार आहे.
आमगाव येथील वाढीव पाणी पुरवठा योजनेचे कार्य सुरु आहे. परंतु श्रेय लादण्याच्या प्रयत्नात दि. २८ आॅगस्टला अपूर्ण बांधकाम असलेल्या योजनेचा लोकार्पण सोहळा घेण्यात आला. परंतु योजनेचे लोकार्पण सुरु असतानाच या योजनेतील जलवाहिण्या अनेक ठिकाणी फुटल्या. त्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यांवर वाहून गेले. त्यामुळे लोकार्पणाचे पितळ उघडे पडले. आजघडीला या योजनेचे कार्य अपुर्णच आहे. (शहर प्रतिनिधी)