बांधतलावासाठी गुरूजी उपोषणावर
By Admin | Updated: October 24, 2015 01:45 IST2015-10-24T01:45:30+5:302015-10-24T01:45:30+5:30
सूर्याटोलातील बांध तलावाला भूमाफियांच्या कब्जातून मुक्त करण्यासाठी गेल्या १० वर्षांपासून लढा देत असलेले ७३ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक डी.एस. सूर्यवंशी यांनी ...

बांधतलावासाठी गुरूजी उपोषणावर
गोंदिया : सूर्याटोलातील बांध तलावाला भूमाफियांच्या कब्जातून मुक्त करण्यासाठी गेल्या १० वर्षांपासून लढा देत असलेले ७३ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक डी.एस. सूर्यवंशी यांनी अखेर गुरूवारपासून (दि.२२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. त्यांना परिसरातील अनेक लोकांनी पाठींबा दर्शविला आहे.
सूर्यवंशी यांनी गुरूवारी सकाळी ११ वाजता सूर्याटोलातील महालक्ष्मी दुर्गा उत्सव समितीच्या मंडपात आंदोलनासंदर्भात परिसरातील नागरिकांची चर्चा केली. त्यानंतर तुळजाभवानी मंदिरात पूजा-अर्चना करून तहसील कार्यालयासमोरील डॉ.आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण केले व जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणस्थळी पोहोचले. दुपारी ३ पासून त्यांनी या लढ्याला तीव्र करण्यासाठी उपोषणाला सुरूवात केली. यावेळी बांधतलाव जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष नयनकुमार खोब्रागडे, उपाध्यक्ष केवलराम गौतम, सचिव के.वी. कावडे, सीताराम लांजेवार, रवी काकडे, डॉ.टी.एम. ढेकवार, के.के. शेंडे, एन.डी.पारधी, विठ्ठल मते, विनायकराव शहारे, प्रभाकर वराडे आदींसह इतर काही लोक त्यांच्या समर्थनासाठी पहिल्या दिवशी मंडपात हजर होते. (जिल्हा प्रतिनिधी)