गुजराती राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST2021-02-05T07:48:25+5:302021-02-05T07:48:25+5:30
......... गायत्री शक्तीपीठ गोंदिया गोंदिया : गायत्री शक्तीपीठ गोंदिया येथे प्रजासत्ताक दिनी भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ...

गुजराती राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय ()
.........
गायत्री शक्तीपीठ गोंदिया
गोंदिया : गायत्री शक्तीपीठ गोंदिया येथे प्रजासत्ताक दिनी भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. रामकुमार दीक्षित, प्रदीप अग्रवाल यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. संचालन राम लालवानी व आभार श्याम लालवानी यांनी मानले.
........
महावीर मारवाडी स्कूल ()
गोंदिया : महावीर मारवाडी स्कूल सोसायटी तर्फे संचालित महावीर मारवाडी बालक मंदिर, रामकुवर इंदरचंद अग्रवाल राजस्थान इंग्लिश प्रायमरी स्कूल, हिरादेवी राध्येशाम अग्रवाल, महावीर मारवाडी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे ध्वजारोहण माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष मुंदडा, पवनकुमार अग्रवाल, प्रकाशचंद कोठारी, वेदप्रकाश गोयल, सुरेशकुमार लोहिया, राजेश अग्रवाल, अजय खंडेलवाल, नरेश अग्रवाल, देवेंद्र जोशी, अमित खंडेलवाल, मुख्याध्यापक अभिषेक अग्रवाल, पंकज शर्मा, अनिता द्विवेदी, शारदा चौबे, अजय शामका, कविता येडे, प्रशांत वासनिक उपस्थित होते.
........
आंबेडकर चौक सावराटोली ()
गोंदिया : स्थानिक आंबेडकर चौक व सूरज सावराटोली येथील ध्वजारोहण सौरभ जायस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली शिवकुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक विष्णू शर्मा, दीपक कनोजे, सुनील जायस्वाल, नरेंद्र आस्टीकर, खेमन चव्हाण, श्रीधर भेलावे, शैलेंद्र मेश्राम, नरेश वंजारी, सुनील मेश्राम, राजू तिगाला, नरेंद्र अंबादे, छोटू बागडे, विवेक डोंगरे, अवनित चव्हाण, रमेश वैद्य, दुलिचंद बैरीसाल उपस्थित होते.
........
धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय ()
गोंदिया: गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचालित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांच्या हस्ते ध्वाजरोहण करण्यात आले. यावेळी डॉ. नायडू यांनी भारताचा संविधान व कोरोना लसीचे संशोधन करणाऱ्या वैैज्ञानिकांचे आभार मानले. यावेळी शारीरिक विभाग प्रमुख डॉ. एजाज शेख, प्रा. अजय रूखीयांना, प्रा. नरेश असाटी उपस्थित होते.
.........