धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात राज्यसेवा स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:29 IST2021-04-20T04:29:53+5:302021-04-20T04:29:53+5:30

डाॅ. अंजन नायडू यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आईक्यूएसी समन्वयक डाॅ. दिलीप चौधरी यांनी ...

Guide on State Service Competitive Examination in Dhote Bandhu Science College () | धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात राज्यसेवा स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन ()

धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात राज्यसेवा स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन ()

डाॅ. अंजन नायडू यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आईक्यूएसी समन्वयक डाॅ. दिलीप चौधरी यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धर्मवीर चव्हाण यांनी केले. प्रास्ताविकात प्रा. धर्मवीर चव्हाण यांनी उडान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा उद्देश व उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. पियुष मानवतकर यांनी आपल्या मार्गदर्शनात ‘राज्य सेवा स्पर्धा परीक्षेची तयारी’ या विषयावर मार्गदर्शन करताना राज्यसेवा परीक्षेचे अभ्यासक्रम, परीक्षेच्या विविध स्तरांचा अभ्यास कसा करावा, वेळेचे नियोजन, योग्य शैक्षणिक साहित्य तसेच भाषेवरील प्रभुत्व यावर विस्तृत मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीत कोणते प्रश्न विचारले जातात व त्यांची उत्तरे कशी द्यावीत, यावरसुद्धा मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन शिबिर झूम मिटिंग ॲप्लिकेशनवर घेण्यात आले. या मार्गदर्शन व्याख्यानमालेमध्ये २०० विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाॅ. अंजन नायडू यांच्या मार्गदर्शनात प्रा. संजय तिमांडे, डाॅ. दिलीप चौधरी व कार्यक्रमाचे संयोजक प्रा. धर्मवीर चव्हाण आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Web Title: Guide on State Service Competitive Examination in Dhote Bandhu Science College ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.