शेतकऱ्यांना किडरोग व जैवक शेतीवर मार्गदर्शन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:53 IST2021-03-13T04:53:56+5:302021-03-13T04:53:56+5:30
साखरीटोला : लगतच्या ग्राम सातगाव येथे तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात आत्मा अंतर्गत प्रगतिशील शेतकरी सुरेश बोहरे यांच्या शेतात ...

शेतकऱ्यांना किडरोग व जैवक शेतीवर मार्गदर्शन ()
साखरीटोला : लगतच्या ग्राम सातगाव येथे तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात आत्मा अंतर्गत प्रगतिशील शेतकरी सुरेश बोहरे यांच्या शेतात एकदिवसीय कौशल्य विकास शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले.
मार्गदर्शन म्हणून तालुका कृषी अधिकारी अजिंक्य दुधाने, प्रा. विपिन ब्राह्मणकर, प्रगतिशील शेतकरी तुकाराम बोहरे, साधू बहेकार, सुरेश बोहरे, सरपंच नरेश कावरे, ग्रामपंचायत सदस्य सुषमा काळे, कृषी मित्र किशोर वालदे, राधाकिसन चुटे, कृषी सहायक उपरीकर व नागपुरे उपस्थित होते. या प्रशिक्षणात कीड व रोग, तसेच जैविक शेतीबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपल्या शेतात निंबोळी अर्क दशपर्णी व कुजलेल्या वस्तूंपासून खत व औषध कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना देण्यात आले. सूत्रसंचालन करून आभार एस. आर. पुस्तोडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी देवराज भदाडे व कृष्णा डुकरे यांनी सहकार्य केले. प्रशिक्षणाला मोठ्या संख्येने शेतकरी, महिला व शेतमजूर उपस्थित होते.