शेतकऱ्यांना कृषिपूरक उद्योगांवर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:47 AM2018-09-19T00:47:06+5:302018-09-19T00:48:07+5:30

सेवा संस्थेतर्फे शेतकऱ्यांना कृषीपूरक उद्योग व शेतीसंबंधी मार्गदर्शन कार्यशाळा गोरेगाव तालुक्यातील मांडोदेवी देवस्थानाच्या सभागृहात नुकतीच आयोजित करण्यात आली होती.

Guidance on Farmer Industry to Farmers | शेतकऱ्यांना कृषिपूरक उद्योगांवर मार्गदर्शन

शेतकऱ्यांना कृषिपूरक उद्योगांवर मार्गदर्शन

Next
ठळक मुद्देसेवा संस्थेचा उपक्रम : वन्यजीव संवर्धनाची दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सेवा संस्थेतर्फे शेतकऱ्यांना कृषीपूरक उद्योग व शेतीसंबंधी मार्गदर्शन कार्यशाळा गोरेगाव तालुक्यातील मांडोदेवी देवस्थानाच्या सभागृहात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार व मान्यवरांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून भरत जसानी, वनपरिक्षेत्राधिकारी जाधव, कार्यक्रम अधिकारी बीएनएचएस नागपूर संजय करकरे, हिवरा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ नरेंद्र देशमुख, प्रगतीशिल शेतकरी धनीराम भाजीपाले, आत्मा अधिकारी सचिन कुंभार, उपाध्यक्ष चेतन जसानी, जी.एम.रहांगडाले, संचालक चिराग पाटील, कृषी विकास संस्थेचे नरेश मेंढे, एफ.आर.बिसेन, हवन लटाये, अंकीत ठाकूर, योगेंद्र बिसेन, अभिजीत परिहार, शशांक लाडेकर, दुष्यंत आकरे, कन्हैया उदापुरे,सरपंच विजय सोनवाने, सुरेंद्र मेंढे उपस्थित होते.
कार्यशाळेत शेळीपालन एक पर्यायी व्यवसाय, कृषीविषयक शासकीय योजना, बागायती शेती, सेंद्रीय शेतील गौणवन उपज व बांबूवर आधारीत व्यवसाय, शेतमालाची शेतकरी ते थेट ग्राहकांना विक्री या विषयांवर तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमातंर्गत जंगलव्याप्त भागातील लोकांना व आणि उपजिवीकेचे जास्त पर्याय नाही.
त्यांना कृषी पूरक व्यवसायांची माहिती देवून रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने संस्थेने ही कार्यशाळा आयोजित केली. वन-वन्यजीव संरक्षणाकरीता कायदा आहे व यंत्रणा आहे. तसेच पर्यावरणवादी संस्थाही आहेत.
मात्र यातून पूर्णपणे संरक्षण व संवर्धन शक्य नाही. जोपर्यंत स्थानिक लोकांचा व समुदायाचा संवर्धनाच्या कामात हातभार लागत नाही. तोपर्यंत हे पवित्र कार्य शक्य नाही. त्यासाठी वनांच्या संवर्धनासह स्थानिक लोकांसाठी पर्यायी उपजिवीकेचे साधन व व्यवसाय उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे सावन बहेकार यांनी शेतकºयांना मार्गदर्शन करताना सांगितले. सेवा संस्था ही पर्यावरण व वन्यजीव संरक्षणाकरीता गोंदिया जिल्हा व लगतच्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे.
ज्यामध्ये आययूसीएन व वनविभागाच्या मदतीने सेवा संस्था विदर्भातील व्याघ्रक्षेत्राचे एकात्मीक संगोपन आणि परिस्थिकीय विकास या कार्यक्रमातंर्गत नवेगाव-नागझिरा कॉरीडोर मधील १३ गावामध्ये कार्य करीत आहे. वाघ व वन्यजीवांचा अधिवास व भ्रमणमार्गाचे संरक्षणासह व गावांचा सर्वांगिन विकास साधने हा संस्थेचा मूळ उद्देश असल्याचे चेतन जसानी यांनी सांगितले.
कार्यशाळे दरम्यान स्थानिक लोकांच्या जनजागृती व मार्गदर्शनासाठी वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनी व कलाकृती प्रदर्शनीचे आयोजित करण्यात आली होती.
गावातील शेतकरी महिला बचत गट व पुरुष बचत गटाच्या तिनेशवर सदस्यांनी कार्यशाळेला उपस्थिती लावून तज्ञांचे मार्गदर्शन ऐकले.

Web Title: Guidance on Farmer Industry to Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.