पालक सचिव मिना यांनी केली पाहणी
By Admin | Updated: March 8, 2015 01:12 IST2015-03-08T01:12:13+5:302015-03-08T01:12:13+5:30
तिरोडा तालुक्यात मागील आठवड्यात पावसाने थैमान घातले होते. २४ तासात तालुक्यात ११० मि.मी. व परसवाडा महसुली मंडळात ११७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.

पालक सचिव मिना यांनी केली पाहणी
परसवाडा : तिरोडा तालुक्यात मागील आठवड्यात पावसाने थैमान घातले होते. २४ तासात तालुक्यात ११० मि.मी. व परसवाडा महसुली मंडळात ११७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. शनिवारी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून प्रधान सचिव व गोंदिया जिल्हा पालक सचिव पी.एस.मिना यांनी नुकसानग्रस्त परसवाडा परिसरात पाहणी करून परिस्थिती जाणून घेतली.
सकाळी ११ वाजता परिसरातील बघोली, परसवाडा, इंदोरा-बु., करटी-बु. गावात जाऊन शेतात पिकांची पाहणी केली. अकाली पावसाने हरभरा, लाखोरी, जवस, गहू, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यादरम्यान जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आ. विजय रहांगडाले, मुख्य कार्यकारी अधिकारी गावंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट व पिकांच्या नासाडीची पाहणी केली होती व संपूर्ण नासाडीचा अहवाल राज्य सरकारला पाठविला होता. त्यानंतर पालक सचिवांनी ही भेट दिली.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, खंडविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, तहसीलदार सुभांगीनी आधंळे, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, कृषी अधिकारी चरडे, जि.प.सदस्य डॉ. योगेंद्र भगत, रमेश पटले, ग्रामसेवक, तुरकर, रामा, जमईवार, तलाठी उके, कृषी सहायक खंडाईत, कृषी मंडळ अधिकारी रहांगडाले, सर्व कृषी विभाग, महसुली, पंचायत समितीचे अधिकारी विस्तार होते. (वार्ताहर)