गोंदिया-चांदाफोर्ट मेमोला डब्बे वाढवा

By Admin | Updated: May 8, 2016 01:41 IST2016-05-08T01:41:28+5:302016-05-08T01:41:28+5:30

गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावर धावणारी रेल्वे मेमो सकाळी १०.१५ वाजता गोंदियावरून प्रस्तान होते.

Grow Gondia-Chandafort Memo Tables | गोंदिया-चांदाफोर्ट मेमोला डब्बे वाढवा

गोंदिया-चांदाफोर्ट मेमोला डब्बे वाढवा

त्रासदायक प्रवास : प्रवाशांची मागणी
बाराभाटी : गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावर धावणारी रेल्वे मेमो सकाळी १०.१५ वाजता गोंदियावरून प्रस्तान होते. या मेमोला प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. या गाडीचे डबे वाढविण्याची मागणी प्रवाश्यांकडून होत आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यामधून या मेमोला प्रतिसाद मिळतो. मात्र या रेल्वेत प्रवाशांची गर्दी होत असल्यामुळे प्रवास करतांना नागरिकांची कोंडी होते. आता या मेमोला ६ डब्बे आहेत. त्यामुळे या रेल्वेमध्ये सर्व डब्यामध्ये अनेक प्रवासी उभे राहून प्रवास करतात. काही रेल्वेच्या दरवाज्यावर बसून प्रवास करतात. त्याचप्रमाणे या मेमोची कुठलीही जागा मिळो त्याठिकाणी राहून प्रवास करतात. अशावेळी प्रवाशी नागरिकांनी जीवित हाणीला होत आहे, अशा मनमानी त्रासदायक गर्दीमध्ये प्रवासाचे झटके सहन करतात.
या गाडीचा थांबा २ मिनीटे असतो. या प्रकारामुळे नागरिकांना चढणे-उतरणे हे खूपच कठीण होते. अनेक वेळा प्रवासी गाडीतून पडतात. प्रवाश्यानचे हात-पाय तुटतात तर कधी जीव गमावण्याच्या प्रसंग उद्भवतो.
सद्या लग्नसराईचे व तेंदूपत्ता साठी जाणाऱ्या मजूरांची या गाडीत प्रचंड गर्दी असते. त्यासाठी डब्बे वाढले पाहिजे. २ मिनीटाचा थांबा हवा आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी बाराभाटी, येरंडी, कुंभीटोला, बोळदे, ब्राम्हणटोला, पिंपळगाव, खांबी येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Grow Gondia-Chandafort Memo Tables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.