शहीद पोलिसांना अभिवादन

By Admin | Updated: October 22, 2016 00:28 IST2016-10-22T00:28:41+5:302016-10-22T00:28:41+5:30

आपले कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि शिपायांना पोलीस स्मृती दिनानिमित्त शुक्रवारी (दि.२१) अभिवादन करण्यात आले.

Greetings to the martyr's police | शहीद पोलिसांना अभिवादन

शहीद पोलिसांना अभिवादन

 

गोंदिया : आपले कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि शिपायांना पोलीस स्मृती दिनानिमित्त शुक्रवारी (दि.२१) अभिवादन करण्यात आले. कारंजा पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहिले आणि उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्र माला माजी जि.प.अध्यक्ष रजनी नागपूरे, भारतीय वनसेवेचे परिविक्षाधीन अधिकारी राहूल पाटील, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, आमगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना, राखीव पोलीस निरिक्षक सुनिल बामडेकर, पोलीस निरिक्षक शुक्ला (गोंदिया शहर), देशमुख (रामनगर) पाटील (गोंदिया ग्रामीण), उईके (गंगाझरी) कोळी (तिरोडा), गावडे (रावणवाडी), सांडभोर (आमगाव), कदम (गोरेगाव), चव्हाण (नवेगावबांध), बंडगर (अर्जुनी/मोर), भस्मे (केशोरी), खंदारे (सालेकसा), तिवारी (चिचगड), तटकरे (देवरी), स्थानिक गुन्हे शाखेचे रणवरे, नक्षल सेलचे केंद्रे, जिल्हा विशेष शाखेचे धुमाळ, कार्यालयीन अधीक्षक संतोष गेडाम, वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक डोंगरे, सहायक पोलीस निरिक्षक हेमने (दवनीवाडा), वाभळे (डुग्गीपार), पोलीस उपनिरिक्षक वाघ, शेख, सातपुते, पुजारी, खरड, राज्य राखीव दल अमरावती व जालनाचे कंपनी कमांडर व प्लाटून कमांडर, पोलीस मुख्यालयाचे चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्र माचे संचालन पोलीस उपनिरिक्षक गोसावी यांनी केले.(जिल्हा प्रतिनिधी)

४७३ अधिकारी-शिपाई शहीद
यावेळी आतापर्यंत शहीद झालेल्या ४७३ पोलीस अधिकारी व शिपायांच्या नावाचे वाचन गोंदिया उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांनी केले. बंदुकीच्या ९० फैरी हवेत झाडून शहीद पोलीस अधिकारी व शिपायांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस बँड पथकाचाही सहभाग होता.

Web Title: Greetings to the martyr's police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.