कामठा सर्कलतर्फे महामानवाला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:28 IST2021-04-17T04:28:44+5:302021-04-17T04:28:44+5:30

.............. खांबी पिंपळगाव येथे आंबेडकर जयंती बाराभाटी: महामानव क्रांतिसूर्य बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ...

Greetings to Mahamanwala from Kamtha Circle | कामठा सर्कलतर्फे महामानवाला अभिवादन

कामठा सर्कलतर्फे महामानवाला अभिवादन

..............

खांबी पिंपळगाव येथे आंबेडकर जयंती

बाराभाटी: महामानव क्रांतिसूर्य बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यभर अगदी साधेपणाने साजरी करण्यात आली. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी येथे आनंद बुद्ध विहार समितीच्यावतीने अगदी साधेपणाने व शासनाने आखून दिलेल्या नियमाचे पालन करीत बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष रतन रामटेके, उपाध्यक्ष नागेश लोणारे, सचिव विशाल रामटेके, भाविक रामटेके, शैलेंद्र बोरकर, हर्षपाल लोणारे, मयुर लोणारे, तुषार रामटेके, सूरज रामटेके, वैभव रामटेके, आकाश रामटेके, विश्वरत्न रामटेके उपस्थित होते.

..........

लोहिया विद्यालय

सौंदड : येथील लोहिया शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली. जगदीश लोहिया यांच्या हस्ते विद्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक मनोज शिंदे, टी. बी. सातकर, एस.पी.मांडारकर,डी. एस. टेंभुर्णे, जे. एम. झोडे, आर.आर. मोहतुरे,डी.के. राऊत, पी.डी. हटकर व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Mahamanwala from Kamtha Circle