नव्या फायर स्टेशनला ‘ग्रीन सिग्नल’

By Admin | Updated: May 22, 2015 02:06 IST2015-05-22T02:06:57+5:302015-05-22T02:06:57+5:30

गोंदियातील नव्या फायर स्टेशनला ग्रीन सिग्नल मिळाले असून या स्टेशनचे निर्माण कार्य आता लवकरच सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'Green signal' to new fire station | नव्या फायर स्टेशनला ‘ग्रीन सिग्नल’

नव्या फायर स्टेशनला ‘ग्रीन सिग्नल’

गोंदिया : गोंदियातील नव्या फायर स्टेशनला ग्रीन सिग्नल मिळाले असून या स्टेशनचे निर्माण कार्य आता लवकरच सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील रिंग रोडवरील मजारच्या मागे यासाठी आरक्षीत जागेवर हे नवे फायर स्टेशन तयार केले जाणार आहे. शिवाय यातच कर्मचाऱ्यांचे क्वार्टर्सही तयार केले जाणार आहे.
शहरात आजघडीला एकच फायर स्टेशन असल्याने शहराच्या वाढत्या लोकसंख्या व क्षेत्राला लक्षात घेता त्यावर ताण व जबाबदारी वाढत चालली आहे. शिवाय येथील फायर स्टेशनमधूनच अवघ्या जिल्ह्यातील आगजळीच्या घटनांवर नियंत्रण मिळविले जाते. त्यामुळे बदलत्या स्थितीनुसार शहरात एक दुसरे फायर स्टेशन तयार करण्याचा पालिकेचा विचार होता.
त्यासाठी नगर विकास मंत्रालय मुंबईकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
हे नवे फायर स्टेशन तयार करण्यासाठी पालिकेने रिंग रोडवर असलेल्या मजारच्या मागची एक जागा आरक्षीत करून ठेवली होती. रिंगरोडवर तयार करण्यात येणाऱ्या या फायर स्टेशनच्या माध्यमातून पुला पलीकडील भागातील आगजळींच्या घटनांवर नियंत्रण मिळविणे जास्त सुविधाजनक ठरणार असा पालिकेचा यामागचा दृष्टीकोन होता. त्यामुळेच हे नवे फायर स्टेशन पुला पलीकडे तयार करण्याचा प्रस्ताव होता. शिवाय हे फायर स्टेशन तयार झाल्यास विद्यमान फायर स्टेशनवरील ताण कमी होणार यात शंका नाही.
मध्यंतरी पालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष मुंबईला गेले असता त्यांनी नगर विकास मंत्रालयात पडून असलेली फायर स्टेशनची फाईल मंत्रालयात पाठविली. त्यामुळे या नव्या फायर स्टेशनसाठी एक कोटी २० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता लवकरच नव्या फायर स्टेशनचे काम सुरू करण्यात काही अडचण येणार नाही. हे फायर स्टेशन झाल्यास अवघ्या जिल्ह्यासाठीच सोयीचे होणार यात शंका नाही. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 'Green signal' to new fire station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.