हिरव्या पालेभाज्यांनी सजली बाजारपेठ
By Admin | Updated: December 1, 2015 05:55 IST2015-12-01T05:55:04+5:302015-12-01T05:55:04+5:30
जेवणाचा खरा मजा हिवाळ्यातच, असे घरच्या मोठ्यांकडून बोलले जाते. मात्र हे फक्त बोलण्या पुरतेच नसून ही

हिरव्या पालेभाज्यांनी सजली बाजारपेठ
पालक, मेथी व चवळीची मागणी : पोपट, वाटाणा व तुरीची शेंग ६० रूपये किलो
गोंदिया : जेवणाचा खरा मजा हिवाळ्यातच, असे घरच्या मोठ्यांकडून बोलले जाते. मात्र हे फक्त बोलण्या पुरतेच नसून ही जीवनातली एक वास्तवीकता आहे. कारण आजघडीला बाजारात प्रत्येकच दुकान हिरव्यागार पालेभाज्यांनी सजलेली दिसून येत आहे. पालेभाज्या महाग असल्या तरिही खाणारे मात्र खरेदी करतच आहेत.
उन्हाळा आणि पावसाळ्यात भाज्यांचे उत्पादन होत नसून या काळात भाज्या बाजारात दिसतही नाही. परिणामी मोजक्याच भाज्या खाऊन दोन वेळचे समाधान करून घ्यावे लागते. आज भाज्यांचे दर बघता घाम फुटत असला तरी महागाईमुळे जेवण तर सोडता येणार नाही. परिणामी आहे त्या परिस्थितीशी जुळवून भाज्यांची खरेदी करावीच लागते. त्यात बाजारात गेल्यावर जे मिळेल ते घ्या अशी स्थिती असते.
सध्या हिवाळा सुरू असून हिरव्या भाज्या बाजारात येऊ लागल्याने प्रत्येकच दुकान या पालेभाज्यांनी सजलेली दिसून येत आहे. वर्षभर मिळणाऱ्या भाज्या खाऊन नाकतोंड एक करणाऱ्यांसाठी मात्र ही एक पर्वणीच आहे. यामुळेच मोठ्या प्रमाणात हिरव्या भाज्यांची विक्री होत असल्याने विक्रेतेही खुश आहेत. आरोग्याच्या दृष्टीने हिरव्या भाज्या खाण्यासाठी डॉक्टरही सांगतात. त्यामुळे हिरव्या भाज्यांकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसून येत आहे.
आज बाजारात मेथी, पालक, लालभाजी, बथवा भाजी, चवळी भाजीची धूम आहे.
भाजी तर भाजी शिवाय अन्य पदार्थ तयार करता येत असल्याने हिरव्या भाज्यांना चांगलीच पसंती आहे. त्यामुळेच गोंदियावासी भाज्यांचा आनंदही चांगलाच घेत आहेत. (शहर प्रतिनिधी)
शेंगा सर्वात महागड्या
४तुर, वाटाणे (मटर) व पोपटाच्या दाण्यांची उसळ म्हणताच तोंडाला पाणी सुटते. हिवाळ्यातील या सर्वात फेव्हरेट पदार्थांमधील एक पदार्थ आहे. बाजारात तुर, वटाणे व पोपटीची शेंग आली आहे. हिवाळ््या नंतर या शेंगा दिसत नाही. विशेष म्हणजे यांच्या आवडीनुसार त्यांचे भावही सध्या बाजारात सवार्धिक वधारलेले दिसून येत आहे. अन्य भाज्यांच्या तुलनेत शेंगा महागड्या असून तूर व पोपट ६० रूपये किलो दराने तर वाटाण्याची शेंग ५० रूपये किलो दराने विकली जात आहे.