शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
4
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
5
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
6
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
7
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
8
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
9
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
11
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
12
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
13
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
14
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
15
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
16
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
17
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
18
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
19
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
20
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार कोटींच्या विकास कामांना हिरवी झेंडी

By admin | Updated: December 11, 2014 23:08 IST

गोंदिया नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर घेण्यात आलेली दुसरी आमसभा रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी सुखद ठरली आहे. या आमसभेत रोजंदारी कर्मचाऱ्यांना किमान

न.प.ची आमसभा : रोजंदारी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणार
गोंदिया : गोंदिया नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर घेण्यात आलेली दुसरी आमसभा रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी सुखद ठरली आहे. या आमसभेत रोजंदारी कर्मचाऱ्यांना किमान वेतनासह सुमारे साडेचार कोटींची कामे व शहरात एलईडी लाईट्स लावण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
२२ आॅगस्ट रोजी नगरपरिषदेवर सत्ता काबीज केल्यानंतर नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या कार्यकाळातील दुसरी आमसभा १० डिसेंबर रोजी पालिकेच्या सभागृहात बुधवारी घेण्यात आली. वास्तविक नियमानुसार महिन्यातून एकदा स्थायी समितीची सभा तर दोन महिन्यातून एकदा आमसभा घेणे बंधनकारक आहे. मात्र चार महिन्यांचा काळ होत असताना आमसभा नाही आणि स्थायी समितीची सभाही झाली नव्हती. भाजप-सेनेच्या कार्यकाळात शहरातील विकासकामांकडे दुर्लक्षीतपणा होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. त्यामुळे या आमसभेची प्रतीक्षा सर्वांना लागली होती.
आमसभेत रोजंदारी कर्मचारी युनियनतर्फे करण्यात आलेल्या किमान वेतन लागू करण्याच्या मागणीवर चर्चा करून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात नगरपरिषदेला दरमहा सुमारे ३० लाख रूपयांपर्यंत वेतन द्यावे लागणार आहे. याशिवाय, शहरातील पथदिव्यांच्या विषयावर चर्चा करण्यात आली व सर्व पथदिवे आता इलईडी लाईटमध्ये परिवर्तीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात नगरपरिषदेला सुमारे ५० टक्के वीजेची बचत होऊन बरेच पैसे वाचण्याची अपेक्षा आहे.
बीआरजीएफ, दलितोत्तर योजना, नागरी दलित वस्ती सुधार योजना, नगरोत्थान योजनेतील सुमारे साडेचार कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. यासह करवसुली अधिकाऱ्यांची नियुक्ती, सुभाष बागेत कामगार व माळी कंत्राटी पद्धतीवर घेणे, प्रभागांच्या सफाईकरिता सफाई संस्थांकडून निविदा मागविणे यासह अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली.
नगराध्यक्षांमुळेच झाला विलंब!
महाराष्ट्र नगरपरिषद नगर पंचायती औद्योगिक नागर अधिनियम १९६५ कलम ८१ पोट कलम १ अन्वये नगरपरिषदेला महिन्यातून एकदा स्थायी समितीची सभा घेणे तर दोन महिन्यांतून एकदा आमसभा घेणे बंधनकारक आहे. मात्र २२ आॅगस्ट रोजी कशिश जायस्वाल नगराध्यक्षपदी आरूढ झाल्यापासून पालिकेची पहिली स्थायी समितीची सभा ८ डिसेंबर रोजी घेण्यात आली. तसेच ३० आॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या आमसभेनंतर दुसरी आमसभा १० डिसेंबर रोजी घेण्यात आली. विशेष म्हणजे पालिका प्रशासनाकडून नगराध्यक्षांना नियमानुसार या सभांच्या आयोजनासंदर्भात लेखी स्वरूपात कळविण्यात येते.
मात्र त्यांनी मंजुरीच दिली नसल्यामुळे स्थायी समितीची बैठक किंवा आमसभा होऊ शकल्या नाही, असे न.प.प्रशासनाने सांगितले. यामुळे मात्र विकासात्मक विषयांवरील चर्चा खोळंबून ते निर्णयाअभावी पडून होते. (शहर प्रतिनिधी)