कन्यादान योजनेचे अनुदान वाढविणार
By Admin | Updated: April 1, 2015 00:47 IST2015-04-01T00:47:59+5:302015-04-01T00:47:59+5:30
सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबध्द जोडप्यांना सध्या १० हजार रुपये अनुदान कन्यादान योजनेतून शासनातर्फे दिले जातात.

कन्यादान योजनेचे अनुदान वाढविणार
गोंदिया : सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबध्द जोडप्यांना सध्या १० हजार रुपये अनुदान कन्यादान योजनेतून शासनातर्फे दिले जातात. सामाजिक न्याय विभागाकडून या योजनेच्या जाचक अटी शिथील करून अनुदानात वाढ करून २५ हजार रुपये देण्याचा विचार आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
बघेडा येथील श्री सूर्यादेव मांडोबाई देवस्थान समितीतर्फे आयोजित सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर आ.गोपालदास अग्रवाल, आ.संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, गोंदियाचे नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, माजी आ. हेमंत पटले, माजी आ. खोमेश रहांगडाले, जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, जि.प. सभापती मोरेश्वर कटरे, डॉ.अंशु सैनी, अॅड. नामदेव किरसान, हनुवत वट्टी, झामसिंग बघेले, संतोष चव्हाण, नंदू बिसेन, भरत क्षत्रिय, लिखेंद्र बिसेन, तहसीलदार शिल्पा सोनाले, तहसीलदार भंडारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.संजय पुराम यांनी आपण या क्षेत्राचा विकासाकरिता कटिबध्द असल्याचे सांगितले. मांडोदेवी समितीचे सचिव विनोद अग्रवाल यांनी संचालन करताना मांडोदेवी देवस्थानाकरिता शासनाकडे ५ कोटींची मागणी केली. तसेच कन्यादान योजनेच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी करून संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
या विवाह सोहळ्याचा यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष भैयालाल सिंद्राम, कुसन घासले, सीताराम अग्रवाल, डॉ. लक्ष्मण भगत, दिलीप चौधरी, हुकुमचंद अग्रवाल, मुन्ना असाटी, चंद्रशेखर बोपचे, अशोक देशमुख, धुर्वराज पटले, देवेंद्र तामसेटवार, सखाराम सिंद्राम, शालीकराम हुकरे, योगराज धुर्वे, प्रेमलाल धावडे, रामदास ब्राम्हणकर, श्यामराव ब्राम्हणकर, किशोर शेंडे, दिलीप खंडेलवाल, उमेश सेवूत, महेश घासले, पोषण मडावी, ग्रामसेवक कुबडे, शिवा सरोटे, प्रकाश शिवणकर, गिरधारी बघेले, गुड्डू पटले, रोहित अग्रवाल, राहुल अग्रवाल, हेमंत भुते, टोपराम बहेकार, महेंद्र मेश्राम आदींनी परिश्रम घेतले. (जिल्हा प्रतिनिधी)