लाच घेताना ग्रामसेवकाला अटक

By Admin | Updated: August 28, 2015 01:43 IST2015-08-28T01:43:49+5:302015-08-28T01:43:49+5:30

तालुक्यातील तिगाव येथे शासकीय जवाहर विहीर बांधकाम बिलाचे देयक काढण्यासाठी रोजगार सेवकाच्या माध्यमाने ...

Gramsevak was arrested for accepting a bribe | लाच घेताना ग्रामसेवकाला अटक

लाच घेताना ग्रामसेवकाला अटक

६००० घेतले : शासकीय विहीर बांधकाम प्रकरण
आमगाव : तालुक्यातील तिगाव येथे शासकीय जवाहर विहीर बांधकाम बिलाचे देयक काढण्यासाठी रोजगार सेवकाच्या माध्यमाने ६ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ग्रामसेवक एस.एस. सिंगनधुपे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
तालुक्यातील तिगांव येथे हरिचंद भैय्यालाल बारेवार या शेतकऱ्याने शासकीय विहीरीचे बांधकाम शेतात केले. या बांधकामावरील १ लाख २८ हजार मंजुर निधीपैकी ९४ हजार ६५७ रुपयांचे देयक ग्रामपंचायतकडून घेणे बाकी होते. या मंजुर निधीतील कमिशन स्वरुपात ग्रामसेवक व रोजगार सेवकाने १० हजार रुपयांची मागणी केली. परंतु सदर देवाण-घेवाण ६ हजार रुपयांवर ठरले.
दिनांक २६ आॅगस्टला रोजगार सेवक धनपाल कटरे यांच्यामार्फत ग्रामसेवकाने ६ हजार रुपयांची लाच फिर्यादीकडून स्विकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली. आरोपीविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Gramsevak was arrested for accepting a bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.