ग्रामगीता भागवत सप्ताहाची सांगता
By Admin | Updated: November 17, 2014 22:57 IST2014-11-17T22:57:34+5:302014-11-17T22:57:34+5:30
जवळच असलेल्या घुसोबाटोला येथील हभप फलहारी महाराज यांच्या अविरत प्रयत्नाने व नियमित वास्तव्याने हजारो भाविकांचे श्रध्दास्थान बसलेले श्रीक्षेत्र रामकृष्ण मंदिर जानकी आश्रम त्रिकुट

ग्रामगीता भागवत सप्ताहाची सांगता
बोंडगावदेवी : जवळच असलेल्या घुसोबाटोला येथील हभप फलहारी महाराज यांच्या अविरत प्रयत्नाने व नियमित वास्तव्याने हजारो भाविकांचे श्रध्दास्थान बसलेले श्रीक्षेत्र रामकृष्ण मंदिर जानकी आश्रम त्रिकुट पहाडी येथे मागील सात दिवसांपासून सुरू असलेले श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ ग्रामगीता संतकथा सप्ताहाची सांगता कीर्तन प्रवचनाने झाली.
यावेळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भागवत सप्ताहाच्या सांगता समारंभाला खा. नाना पटोले प्रामुख्याने उपस्थित होते. त्रिकुट पहाडी या श्रध्दास्थानी उपस्थित हजारो भाविकांना मार्गदर्शन करताना खा. नाना पटोले म्हणाले, समाजातील तळागाळातील जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वरसेवा आहे. समाजावर कोणतीही आपत्ती आली तरी न घाबरता हिंमतीने दूर करता येतात. फलहारी महाराज हे समाज व्यसनमुक्त करण्यासाठी अविरत परिश्रम घेत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
दिग्रस येथील हभप रामेश्वर खोडे महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले, समाजाला दिशा देण्याकरिता आणि आदर्श समाज घडविण्याकरिता महानत्यागी कर्मयोगी संत गाडगे महाराजांनी संसाराचा त्याग केला. राजा शुध्दोधनाचे चिरंजीव तथागत भगवान गौतम बुध्दांनी आपला राजवैभव सोडून गृहत्याग केला. श्रावण बाळाने आई-बाबाच्या सुखाकरिता देह त्यागले. याप्रमाणे असामान्य कर्तृत्ववान मानव समाजात होऊन गेले. सर्व जगात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. अशा पवित्र संस्कृतीला कलंक लागेल अशी कृती आजच्या युवकांनी करू नये. समाजाचे भाग्यविधाता ठरणाऱ्या युवकांनी व्यसनाधिनतेला तिलांजली देऊन एक नवा आदर्श घडवावा, असे आवाहन त्यांनी केले.
खाडे महाराज पुढे म्हणाले की, गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाज जागृतीकरिता आपले आयुष्य खर्ची घातले. गावोगावी जावून कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. त्यांनी आपल्या वाणीतून सर्व जनतेला अंधश्रध्दा व व्यसनाधिनतेपासून रोखले. व्यसन व अंधश्रध्देमुळे संसाराची राखरांगोळी कशी होते हे त्यांनी पारखले होते. आजची युवा पिढी व्यसनाधिनतेच्या आहारी गेली आहे. दारूच्या नशेत नको ते कार्य युवकांकडून घडून अनेकदा कौटुंबीक आणि सामाजिक ऐक्य धोक्यात येते. आयुष्याची राखरांगोळी होते. समाजामध्ये नवचैतन्य निर्माण होऊन गावागावात शांतात अबाधित राहण्यासाठी गावातून मदिरा हद्दपार होण्जासाढू गावात दारूबंदी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सात दिवस खोडे महाराज यांनी आपल्या अमृतवाणीने बोधामृत पाजले. त्यांच्या मार्गदर्शनात ९७ लोकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला.