लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : सालेकसा तालुक्यातील कारुटोला येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ध्वजारोहण सरपंच राया फुन्ने यांच्या हस्ते पार पडले. यानंतर ग्रामसभा होणार होती. परंतु ऐन महत्त्वाच्या कार्यक्रमात ग्रामसेवक एच. जी. शरणागत गैरहजर होते. त्यामुळे ग्रामसभा झालीच नाही. ग्रामसेवक नेहमीच अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सभांना गैरहजर राहत असल्याने गावकरी चांगलेच संतापले आहेत. येत्या आठ दिवसात ग्रामसेवकावर कारवाई न केल्यास ग्रामपंचायला कुलूप ठोकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.मागील वर्षी सुध्दा १५ ऑगस्ट २०१९ ला ग्रामसेवक गैरहजर होते. सभेचा नोेटीस मात्र त्यांनी स्वत:च काढली होती. पण स्वत:उपस्थित झाले नाही. त्यामुळे ग्रामसभेत ग्रामसेवकाला विचारला जाणारा १४ व्या वित्त आयोगाचा हिशोब गावकऱ्यांना मिळू शकला नाही. वारंवार ग्रामसेवक गैरहजर राहत असल्याने गावकऱ्यांमध्ये चांगलाच संताप आहे.ग्रामसेवक शरणागत यांनी खंडविकास अधिकारी सालेकसा यांच्याकडे डोळ्याच्या ऑपरेशनकरीता सुट्टीचा अर्ज सादर केला आहे. सुट्टी मंजूर आहे की नाही हे कळू शकले नाही. मात्र गावकºयांच्या म्हणण्यानुसार डोळ्याचे ऑपरेशन २६ तारखेनंतरही ते करु शकले असते. पण त्यांना हिशोब द्यायचा नसल्याने ते बहाणा करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ग्रामसेवकावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. येत्या आठ दिवसात गावकºयांना हिशोब देण्यात यावा. अन्यथा ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा गावकºयांनी दिला आहे.यासंबंधिचे निवेदन आ.सहषराम कोरोटे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, खंडविकास अधिकारी, सालेकसा पोलीस स्टेशनला दिले आहे.
ग्रामसेवक गैरहजर राहिल्याने ग्रामसभा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST
मागील वर्षी सुध्दा १५ ऑगस्ट २०१९ ला ग्रामसेवक गैरहजर होते. सभेचा नोेटीस मात्र त्यांनी स्वत:च काढली होती. पण स्वत:उपस्थित झाले नाही. त्यामुळे ग्रामसभेत ग्रामसेवकाला विचारला जाणारा १४ व्या वित्त आयोगाचा हिशोब गावकऱ्यांना मिळू शकला नाही. वारंवार ग्रामसेवक गैरहजर राहत असल्याने गावकऱ्यांमध्ये चांगलाच संताप आहे.
ग्रामसेवक गैरहजर राहिल्याने ग्रामसभा रद्द
ठळक मुद्देगावकऱ्यांचा कुलूप ठोको आंदोलनाचा इशारा : कारुटोला येथील प्रकार