ग्रामपंचायतचे उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्विकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 05:00 IST2020-12-30T05:00:00+5:302020-12-30T05:00:16+5:30
राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजार ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला हाेवू घातली आहे. यासाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी ऑनलाईन उमेवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सुट्या वगळता चार दिवसांच्या कालावधीत राज्यात केवळ ३ लाख ३२ हजार ८४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. २८ डिसेंबरला इंटरनेट आणि ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे संकेत स्थळ बंद असल्याने हजारो उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता आले नाही. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणारे उमेवार अडचणीत आले होते.

ग्रामपंचायतचे उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्विकारणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अट लागू केली होती. मात्र ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इंटनेटची समस्या येत असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अडचण होत होती. याचीच दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने आता ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. ३० डिसेंबरला सायंकाळी ५.३० पर्यंत ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार आहे.
राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजार ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला हाेवू घातली आहे. यासाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी ऑनलाईन उमेवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सुट्या वगळता चार दिवसांच्या कालावधीत राज्यात केवळ ३ लाख ३२ हजार ८४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. २८ डिसेंबरला इंटरनेट आणि ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे संकेत स्थळ बंद असल्याने हजारो उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता आले नाही. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणारे उमेवार अडचणीत आले होते.
ही अडचण लक्षात घेवून आ. विनोद अग्रवाल यांनी सोमवारी राज्याचे निवडणूक आयुक्त मदान यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्विकारण्याची मागणी केली होती. त्यावर मदान यांनी सुध्दा सकारात्मक प्रतिसाद दिला होता. राज्यात इतर ठिकाणी या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने आता उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. ३० डिसेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व तालुका स्तरावर उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार आहे. निवडणूूक लढवू इच्छिणाऱ्या हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातील पत्र सुध्दा मंगळवारी काढले आहे.
जात प्रणाणपत्र तपासणीचे अर्ज सुध्दा घेणार ऑफलाईन
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षित प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. मात्र यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अट होती. पण ग्रामीण भागात इंटरनेटच्या समस्येमुळे ऑनलाईन अर्ज करणे अडचणीचे जात होते. ही समस्या लक्षात घेवून आ. विनोद अग्रवाल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालकांशी चर्चा करुन ऑफलाईन अर्ज स्विकारण्या संदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर हे अर्ज सुध्दा ऑफ लाईन बुधवारी रात्री उशीरापर्यंत स्विकारले जाणार आहे.
चार दिवसात केवळ ६६ अर्ज
जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी २३ डिसेंबरपासूृन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सुट्या वगळता मागील चार दिवसात केवळ ६६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ऑनलाईन प्रकियेमुळे उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अडचण जात होती. त्यामुळे चार दिवसात केवळ ६६ अर्ज दाखल झाले होते.