शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतचा वाजला बिगुल, आता झेडपीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १५ जुलैला संपला मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि प्रशासकराज सुरु आहे. वीस दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने जि.प.च्या सर्कल निहाय आरक्षणावर आक्षेपाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे आता जिल्हा परिषदेची निवडणूक सुध्दा लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देतालुक्यात सर्वाधिक ग्रा.पं.ची निवडणूक : मोर्चेबांधणीला झाली सुरुवात

n  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने मुदत पूर्ण झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर शुक्रवारी जाहीर केला. यातंर्गत जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा सुध्दा कार्यकाळ ६ महिन्यापूर्वीच संपला असून आता त्यांच्या निवडणुका केव्हा जाहीर होतात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १५ जुलैला संपला मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि प्रशासकराज सुरु आहे. वीस दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने जि.प.च्या सर्कल निहाय आरक्षणावर आक्षेपाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे आता जिल्हा परिषदेची निवडणूक सुध्दा लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. सभा, बैठका आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. तर नेत्यांचे दौरे सुध्दा वाढले असून निवडणुकीसाठी सज्ज राहण्यास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगितले जात आहे. त्यातच आता ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्ल्याने यात अजून रंगत वाढली आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यास दोन्ही निवडणुकीच्या निमित्ताने गुलाबी थंडीत राजकीय वातावरण मात्र तापणार असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत ही राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी असून येथूनच पुढील राजकीय वाटचालीला सुरुवात होते. शिवाय १४ व्या वित्त आयाेगामुळे ग्रामपंचायतींचे महत्व सुध्दा वाढले आहे. त्यामुळे यासाठी अनेकांनी गुडघ्याला बांशिग आधीपासून बांधून ठेवले आहे.  ग्रामीण भागावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत ही गाव विकासाचा कणा असते शिवाय यात स्थानिकांचा थेट संपर्क येतो. याच माध्यमातून ग्रामीण भागावर पकड मजबूत करुन पुढील इतर निवडणुकांचे गड सर करणे शक्य होत असते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुका या कुठल्या पक्षाच्या चिन्हाखाली लढविल्या जात नसल्यातरी अप्रत्यक्षपणे त्यावर कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाचा पगडा असतोच.  

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद