ग्राम पंचायत मतदार यादीत घोळ

By Admin | Updated: August 13, 2015 02:16 IST2015-08-13T02:16:48+5:302015-08-13T02:16:48+5:30

अर्जुनी मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या १६ आॅगस्ट रोजी आहे. बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेत...

The gram panchayat nabbed in the voters list | ग्राम पंचायत मतदार यादीत घोळ

ग्राम पंचायत मतदार यादीत घोळ

बाजार समिती निवडणूक : सदस्य मतदानापासून वंचित
बोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या १६ आॅगस्ट रोजी आहे. बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेत तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा सहभागी होता येते. परंतू ग्रामपंचायत मतदार संघाच्या यादीत घोळ झाल्याने काहींना मतदानापासून वंचित राहावे राहावे लागू शकते.
बाजार समितीच्या एकूण संचालकांपैकी ४ संचालक ग्रामपंचायत मतदार संघातून निवडल्या जातात. प्रमाणित झालेल्या ग्रामपंचायत मतदार संघातील मतदार यादीमध्ये घोळ झाल्याची चर्चा आहे. तालुक्यातील एका विद्यमान ग्रामपंचायत सदस्याचे नावच मतदार यादीमध्ये नाही. उलट ज्या सदस्याने राजिनामा दिल्याने सभासदत्व रद्द झाले तरीदेखील त्यांचे नाव मतदानास पात्रे ठरला असल्याचा प्रकार दिसून येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येत्या १६ आॅगस्ट रोजी अर्जुनी/मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊ घातलेली आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत वेगळा ग्राम पंचायत मतदार संघातून चार संचालक निवडल्या जातात. आजघडीला ग्रामपंचायत मतदार संघात ५८२ मतदार असल्याचे संघाच्या यादीवरुन दिसून येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या संबंधाने ३० सप्टेंबर २०१४ च्या स्तरावर ग्रामपंचायत मतदार सघांची यादी बनविण्यात आल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या वतीने घेण्यात येते.
नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्यांची यादी वेळोवेळी पंचायत समितीला पाठविली जात असल्याचे निवडणूक विभागाच्यावतीने सांगण्यात आले. बाजार समितीच्या मतदारांची यादी बनविताना संबंधित विभागाकडून याद्या मागविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
ग्रामपंचायत मतदार संघाची यादी अहर्ता दि. ३०/९/२०१४ मधून बनविण्यात आली आहे. असे असताना बोदरा ग्रामपंचातच्या एका सदस्याचे नाव त्या मतदार यादीमध्ये समाविष्ट न करता पद रिक्त असे दाखवून त्या विद्यमान सदस्यास मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
बोदरा ग्रामपंचायतची निवडणूक २१ आॅक्टोबर २०१० ला घेण्यात आली. एकूण ७ सदस्य असून त्यावेळी ६ सदस्यासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी ६ सदस्य निवडून आले. नामाप्र जागेवर निवडून आलेल्या एका महिला सदस्याने १२/८/२०१३ रोजी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा मंजूर होवून ती जागा भरण्यासाठी निवडणूक विभागाच्यावतीने दोन-तीन वेळा पोटनिवडणूक घेण्याचा कार्यक्रम जाहीर झाला. परंतु आजपावेतो ती जागा भरण्यात आली नाही. तो राजीनामा मंजूर झालेल्या महिला सदस्याचे नाव आजही बाजार समितीच्या मतदार यादीमध्ये असल्याचे दिसून येत आहे.
बोदरा ग्रामपंचायतच्या अनु.जमाती महिला जागेसाठी पोट निवडणूक २३/०६/२०१३ रोजी घेण्यात येवून ती महिला अविरोध निवडून आली. २३/०६/१३ रोजी अविरोध निवडून आलेली एक आदिवासी महिला विद्यमान ग्रा.पं. सदस्य असताना बाजार समितीच्या निवडणुकीत त्या महिलेच्या नावाची नोंद न करता ‘पद रिक्त’ असे दर्शविण्यात आले आहे. हा घोळ कोणी केला हे कळायला मार्गच नाही. (वार्ताहर)

Web Title: The gram panchayat nabbed in the voters list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.