ग्रामपंचायतला ठोकले कुलूप

By Admin | Updated: August 27, 2015 02:05 IST2015-08-27T02:05:35+5:302015-08-27T02:05:35+5:30

तिरोडा तालुक्यातील गोंडमोहाडी येथे शासनाच्या निर्देशानुसार २४ आॅगस्ट रोजी विशेष ग्रामसभा झाली.

Gram Panchayat locked lock | ग्रामपंचायतला ठोकले कुलूप

ग्रामपंचायतला ठोकले कुलूप

ग्रामसेवकाचे पलायन : हिशेब मागताच सोडली ग्रामसभा
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील गोंडमोहाडी येथे शासनाच्या निर्देशानुसार २४ आॅगस्ट रोजी विशेष ग्रामसभा झाली. या सभेत सरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला मागील वर्षाच्या जमा-खर्चाचा हिशेब मागितला. मात्र ग्रामसेवकाने ग्रामसभेतून पलायन केले. या प्रकारामुळे संतापलेल्या गावकऱ्यांना ग्रामपंचायतला कुलूप ठोकले. या प्रकाराची तक्रार गावकऱ्यांनी खंडविकास अधिकाऱ्यांना केली. ग्रामसेवकाची योग्य चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
१५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेवून ग्रामविकासाचा आराखडा तयार करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्याच अनुषंगाने गोंडमोहाडी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच पौर्णिमा वळगाये होत्या. यावेळी प्रामुख्याने उपसरपंच सुभाष कावळे, ग्रामसेवक एन.डी. धुर्वे, ग्रा.पं. सदस्य प्रभा राऊत, पुष्पा बोपचे, धनवंता भगत, भूमेश्वर शेंडे, डॉ. चैतलाल भगत, पोमेश अंबुले, रमेश चौरे, राजू उईके, हेमंत ठाकरे, सुभाष अकरे, तुलसीदास भुजाळे व ग्रामवासीयांच्या उपस्थितीत ग्रामसभा सुरू झाली.
या ग्रामसभेत मागील वर्षीचा जमा-खर्च, १४५ लाभार्थ्यांचे शौचालय बांधकाम याचा हिशेब मागितला असता ग्रामसेवक भांबाहून गेला व ग्रामवासीयांना चकमा देत सभेतून पलायन केले. काही काळ ग्रामवासीयांनी ग्रामसेवक येईल, या आशेने सभेत आपला वेळ काढला. मात्र ग्रामसेवक सभेतून पळाल्याची माहिती मिळताच संतप्त ग्रामवासीयांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. (वार्ताहर)

Web Title: Gram Panchayat locked lock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.