शाळकरी गुणवंतांचा गौरव
By Admin | Updated: January 1, 2017 01:48 IST2017-01-01T01:48:25+5:302017-01-01T01:48:25+5:30
येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारे संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक

शाळकरी गुणवंतांचा गौरव
लोहिया विद्यालय : नाना पटोले यांच्या हस्ते सत्कार
सौंदड : येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारे संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रामदेवबाबा अध्यापक विद्यायक, जमूनादेवी लोहिया प्राथमिक शाळा, लोहिया कॉन्व्हेंट अॅन्ड प्रायमरी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी १० वीच्या परीक्षेत ९० टक्के पेक्षा अधिक गुण व १२ वी मध्ये ८० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना हात घडी व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. १० वी व १२ वी मार्च २०१६ मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, स्व. प्रमोद नशिने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रोख पुरस्कार उद्घाटक खा. नाना पटोले यांच्या हस्ते देण्यात आले. अध्यक्षस्थानी रा.म.संघ डॉ. प्रकाश मालगावे, प्रमुख अतिथी संस्थापक/ संस्थाध्यक्ष लोहीया शिक्षण संस्था जगदिश लोहिया, अध्यक्ष जैन समाज मंडळ संजय पुगलीया, प्रभूदयाल लोहिया उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी संस्थापक/संस्थाध्यक्ष, विद्यालयाचे प्राचार्य मधूसूदन अग्रवाल उपस्थित होते.
यावेळी संस्थेशी संबंधीत सर्व पदाधिकारी, सदस्यगण, पालक, गावकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. (वार्ताहर)