पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
By Admin | Updated: May 24, 2014 23:42 IST2014-05-24T23:42:24+5:302014-05-24T23:42:24+5:30
भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांवर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात येत्या २0 जून रोजी नागपूर पदवीधर मतदार संघासह पाच मतदार संघात निवडणूक होणार आहे

पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
गोंदिया : भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांवर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात येत्या २0 जून रोजी नागपूर पदवीधर मतदार संघासह पाच मतदार संघात निवडणूक होणार आहे. २0 जून रोजी होणार्या या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील १७ हजार ८१४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी एकूण २२ मतदान केंद्र राहणार असून येत्या ३ जून पर्यंंत नवीन पदवीधर मतदारांना नाव नोंदणी करता येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी एस.एन.लोणकर यांनी दिली. राज्यातील औरंगाबाद पदवीधर मतदार संघ, पुणे पदवीधर मतदार संघ, नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ, अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ, पुणे विभाग शिक्षक मतदार संघ अशा एकूण पाच संघात विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भात निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यातील नागपूर पदवीधर मतदार संघात गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १७ हजार ८१४ पदवीधर मतदार संख्या आहे. यात तिरोडात दोन हजार २९१, गोंदिया सहा हजार ६६, दवनीवाडा ५३७, आमगाव दोन हजार पाच, गोरेगाव एक हजार ५९९, सालेकसा ६५९, सडक अर्जुनी एक हजार ७५८, देवरी एक हजार आठ, नवेगावबांध ५१९ तर अर्जुनी मोरगावमध्ये एक हजार ५८३ मतदार आहेत. येत्या २0 जून रोजी होणार्या मतदानासाठी जिल्ह्यातील २२ केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची माहिती लोणकर यांनी दिली. याप्रसंगी गोंदिया व देवरीचे उप विभागीय अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)