आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यासाठी ग्रा.पं.चा ठराव लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST2021-07-07T04:36:08+5:302021-07-07T04:36:08+5:30
गोंदिया : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनामुक्त जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या शाळा मंगळवारपासून (दि.६) सुरु करण्याचा निर्णय घेतला ...

आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यासाठी ग्रा.पं.चा ठराव लागणार
गोंदिया : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनामुक्त जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या शाळा मंगळवारपासून (दि.६) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश सुद्धा जि. प. शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. मात्र कोरोनामुक्त गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतने ठराव पारित करुन पाठविल्यानंतरच शाळा सुरु केल्या जाणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा महाविद्यालय बंद आहे. २८ जूनपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात शाळेत विद्यार्थ्यांनी हजेरी लावली नसून ऑनलाईन शिकवणी सुरु आहे. मात्र राज्यात आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल होत आहे. त्यामुळे शासनाने कोरोनामुक्त असलेल्या गावांमध्ये आता इयता आठवी ते बारावीचे वर्ग मंगळवारपासून (दि.६) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश गोंदिया जि. प. शिक्षण विभागाला सोमवारी प्राप्त झाले. पण शाळा सुरु करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींचा ठराव प्राप्त झाल्यानंतरच शाळा सुरु करण्यात येतील असे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात मंगळवारपासून प्रत्यक्षात शाळेत उपस्थित राहण्याची शक्यता आहे.