पोषण आहारात गौडबंगाल
By Admin | Updated: October 27, 2016 00:30 IST2016-10-27T00:30:55+5:302016-10-27T00:30:55+5:30
प्रत्येक अंगणवाडीला महिन्याचा शालेय पोषण आहार शासनाकडून ठरवून दिलेल्या एजेंसी माध्यमातून दिला जातो.

पोषण आहारात गौडबंगाल
चौकशीची मागणी : अंगणवाडीतील पोषण आहार गायब
आमगाव : प्रत्येक अंगणवाडीला महिन्याचा शालेय पोषण आहार शासनाकडून ठरवून दिलेल्या एजेंसी माध्यमातून दिला जातो. तालुक्यात वाटप होणारा अंगणवाडीच्या पोषण आहारात मोठा गौडबंगाल सुरु आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पोषण देणारी एजेन्सी व सेविकांनी या पोषण आहाराची अफरातफर केली. याची तत्काळ चौकशी करण्याची मागणी अनेकांनी केली आहे.
अंगणवाडीला महिन्याला विद्यार्थ्यांमागे पोषण आहार दिला जातो.यात अंगणवाडी सेविका गाय, म्हैश पालकांना विकतात. एका बाजूला पोषण आहार वाटप केल्याची नोंद रजिस्टरमध्ये घेतात.ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे मुलांना अंगणवाडीत पोषण दिला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात नफा कमविण्यासाठू परस्पर विक्री झाल्याची माहिती आहे. दुसऱ्या बाजूला पोषण आहार अंगणवाडीला देणारी एजेन्सीने दिवाळीला अंगणवाडीला पोषण आहार दिला नाही. उलट पोषण आहार दिल्याची रजिस्टरमध्ये नोंद घेऊन तो पोषण आहार परस्पर गहाळ केला.
या गहाळ प्रकरणात अंगणवाडी सेविकांना एक हजाराच्यावर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भेट देण्यात आल्याची चर्चा आहे. आमगाव गावातील रिसामा येथील काही अंगणवाडी सेविका या प्रकरणाचे मुख्यसुत्रधार असल्याची विश्वसनिय सुलत्रांकडून कळते. काही सेविका संघटनेच्या माध्यमातून आपली दुकानदारी चालवित आहेत. यात मुलांना शिकविणे कमी तर स्वत:चा फायदा कसा होतो, याचाच विचार होत असतो. ही प्रथा अनेक वर्षापासून सुरु आहे. पंचायत समिती परिसरात एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय आहे. तो फक्त शोभेची वास्तू ठरला आहे. एकात्मीक बालविकास अधिकाऱ्याला अंगणवाडीत कोठे काय चालू आहे, याची कल्पना आहे. मात्र ठोस कारवाई करण्याची कुणाची हिंमत नाही. यामुळे शासन योजनेचा अंगणवाड्यांना मिळणारा पोषण आहार खरोखर मुलांना मिळते का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. पोषण आहार मिळाले. ते पोषण आहार वाटप केल्याची रजिस्टरमध्ये नोंद केली जाते. यात मोठे रॅकेट असून संबधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. जे दोषी आहेत त्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी अनेकांकडून होत आहे. विद्यार्थ्यांना दिला जाणाऱ्या शालेय पोषण आहारात अशाच पद्धतीने गैरव्यवहार होत राहिला तर मुलांना कुपोषित व्हावे लागेल. यावर वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)