खड्यात गेला गोवारीटोला-खेडेपार रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:52+5:302021-07-07T04:35:52+5:30
सोनपुरी : सालेकसा तालुक्यात मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्याला जोडणारा महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गोवारीटोला-खेडेपार रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. ...

खड्यात गेला गोवारीटोला-खेडेपार रस्ता
सोनपुरी : सालेकसा तालुक्यात मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्याला जोडणारा महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गोवारीटोला-खेडेपार रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना पडला आहे.
गोवारीटोला-खेडेपार या मार्गावरून ये-जा करणारे नागरिकांना व वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यामुळे या मार्गावरील अपघातांच्या संख्येतसुध्दा वाढ झाली आहे. मध्य प्रदेश व महाराष्ट्राला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. या मार्गावरून दररोज विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी व शेतकरी नियमित ये-ज़ा करतात. खेडेपार परिसरातील पांढरी, पिपरिया, बहेला, बाम्हणी, पठानटोला, लटोरी, पाथरी, नवेगाव, लोधीटोला, गोवारीटोला येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र त्यांची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्याची समस्या कायम आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन समस्या त्वरित मार्गी लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
............
पावसाळ्यात तारेवरची कसरत
सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून गोवारीटोला-खेडेपार या मार्गावरून ये-जा करणारे नागरिकांना व वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे पांढरी, पिपरिया, बहेला, बाम्हणी, पठानटोला, लटोरी, पाथरी, नवेगाव, लोधीटोला, गोवारीटोला या आठ ते दहा गावातील गावकऱ्यांना या मार्गावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.