गोविंद मेश्राम यांचा सत्कार

By Admin | Updated: September 19, 2016 00:30 IST2016-09-19T00:30:14+5:302016-09-19T00:30:14+5:30

बाक्टी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. गोविंद मेश्राम यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सम्मानित

Govind Meshram felicitated | गोविंद मेश्राम यांचा सत्कार

गोविंद मेश्राम यांचा सत्कार

बोंडगावदेवी : बाक्टी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. गोविंद मेश्राम यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आल्याने त्यांचा ग्रामवासी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाक्टी या खेडेगावातील रहिवाशी असलेले डॉ. मेश्राम यांचा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. गावातील एका सामाजिक कार्यकर्त्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल बाक्टी ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने सरपंच जितेंद्र शेंडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य कमल पाऊलझगडे, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीराम राऊत, उपसरपंच प्रेमलाल भोयर, माजी सरपंच सुभाष मेश्राम, प्राचार्य हेमंत राजगिरे, तंमुस अध्यक्ष मोतीराम शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन देवेंद्र दुग्रकर यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Govind Meshram felicitated