शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 00:19 IST2017-02-27T00:19:45+5:302017-02-27T00:19:45+5:30

मागच्या वर्षी देवरी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट होते. शासनाला मदत मागण्याकरीता ककोडी व इस्तारी

Government should waive the farmers' debt | शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे

शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे

सहेषराम कोरोटे : ईस्तारी येथे क्लोज प्रौढ कबड्डी स्पर्धा व समाजप्रबोधन
देवरी : मागच्या वर्षी देवरी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट होते. शासनाला मदत मागण्याकरीता ककोडी व इस्तारी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी पदयात्रा मोर्चा व शेतकरी मेळावा घेवून शासनातील विविध लोकप्रतिनिधींना आपल्या समस्यांबाबत निवेदन देऊन समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली होती. शासनाने दुष्काळ निधी घोषीत केला, परंतु ती निधीची रक्कम अजूनपर्यंत या कोणत्याही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ही घोषणा अद्याप पूर्ण न करता आता केंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील निवडणुकीपूर्वी त्या प्रदेशातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. मग त्याच धरतीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे त्वरीत पूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहेषराम कोरोटे यांनी केली.
तालुक्यातील ईस्तारी येथे आदिवासी गोंड समाज सेवा भावी संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त आयोजित क्लोज प्रौढ कबड्डी स्पर्धा व समाज प्रबोधन कार्यक्रमात ते उद्घाटनपर भाषण करीत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य मोतीराम सयाम होते. याप्रसंगी ईस्तारीचे सरपंच राजकुमार अटभैय्या, पोलीस पाटील अनिता अंबादे, पुर्व गोंड समाजाचे अध्यक्ष बिसराम सलामे, ककोडीचे सरपंच रियाजखान पठाण, चैनसिंग मडावी, बळीराम कोटवार, उपसरपंच जिवनलाल सलामे, पोलीस पाटील मीरा कुंभरे, भवर समाजाचे सचिव प्रकाश गंगाकाचूर, ग्रा.पं.सदस्य महेश बंसोड, मनोहर वालदे, पोअरसिंग आराम, डुकालू ताराम, रघु नरेटी, तुकाय ताराम, चंपा ताराम यांच्यासह ककोडी, ईस्तारी, मिसपीरी, गणूटोला परिसरातील समाजातील बहुसंख्य महिला, पुरूष, युवक व कबड्डी खेळाची चमू उपस्थित होताी.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुलाराम कुमेटी यांनी तर मंच संचालन कुंजीलाल नरेटी यांनी केले. उपस्थितांचे आभार मोहन हियामी यांनी मानले. या बाबुराव हिळको, उपाध्यक्ष पुलाराम नरेटी, सचिव मोहन हियामी, सहसचिव मानकर, कुंभरे, कोषाध्यक्ष दुरूराम ताराम, प्रकाश गंगाकपूर, युवा अध्यक्ष संतोष नेताम, चंपा ताराम व सखाराम कोरेटी यांच्यासह या संस्थेचे इतर पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Government should waive the farmers' debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.