दुबार पेरणीसाठी शासनाने मदत करावी
By Admin | Updated: July 7, 2014 00:00 IST2014-07-07T00:00:09+5:302014-07-07T00:00:09+5:30
राज्य व गोंदिया जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाअभावी मोठ्या आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. त्यांच्यावर दुबार पेरणी वेळ आली आहे. परंतु ही पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ

दुबार पेरणीसाठी शासनाने मदत करावी
शेतकरी अडचणीत : राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची मागणी
गोंदिया : राज्य व गोंदिया जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाअभावी मोठ्या आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. त्यांच्यावर दुबार पेरणी वेळ आली आहे. परंतु ही पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ आज दमडीही शिल्लक नाही. तेव्हा शासनाने ही परिस्थिती समजवून घेवून शेतकऱ्यांना भरीव मागणी करावी, असी मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
७ जूनपासून सुरू झालेल्या पावसाळी नक्षत्रांमधले तब्बल तीन नक्षत्र सताड कोरडे गेल्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील समस्त बळीराजा हवालदिल झाला आहे. अस्मानी संकटाच्या साडेसातीत अडकला आहे. राज्यामध्ये सर्वत्र हीच परिस्थिती असून अनेक शेतकऱ्यांची पेरणी केली आहे. शेतातील कोंब आलेली बियाणे जळून नष्ट झाली.
दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आहे. त्यातच मुलांच्या शिक्षणाचा खर्च यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अश्रू कोरडे पडलेल्या डोळयांनी आकाशाकडे अपेक्षेची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांपुढे फार मोठा गंभीर प्रश्न उभा आहे.
त्यामुळेच शेतकऱ्यांना राज्य सरकाराने सरसकट मोफत बियाणे देऊन किंवा दुबार पेरणीसाठी भरीव आर्थिक मदत करून दिलासा करावे, अशी महत्वपूर्ण मागणी यवतमाळ जिल्ह्याच्यावतीने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने राज्य सरकाराकडे केली आहे.
पावसाळा लांबणीवर पडला असल्याने केवळ शेतकरीच अडचणीत नसून हे एक सामाजिक संकट आहे. त्यामुळे याकरिता सरकाराने पुढाकार घ्यावा, तसेच शेतकऱ्यांना या संकटाच्या काळात एकटे न सोडता भरीव मदत त्वरित जाहीर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महिनाभाराचा कालावधी लोटूनही पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे.