बांधकामांच्या गुणवत्तेवर शासकीय यंत्रणेने विशेष लक्ष द्यावे!
By Admin | Updated: April 7, 2017 01:36 IST2017-04-07T01:36:29+5:302017-04-07T01:36:29+5:30
बांधकाम दर्जेदार झाले नाही तर त्यांची वारंवार दुरूस्ती करावी लागते व त्यावर पैशांची नासाडी होते.

बांधकामांच्या गुणवत्तेवर शासकीय यंत्रणेने विशेष लक्ष द्यावे!
गोपालदास अग्रवाल : ग्रामीण भागात विविध विकासकामांचे भूमिपूजन
गोंदिया : बांधकाम दर्जेदार झाले नाही तर त्यांची वारंवार दुरूस्ती करावी लागते व त्यावर पैशांची नासाडी होते. परिणामी गरजेच्या जागेवर निधीची कमतरता पडते. करिता ग्रामपंचायतसह सर्व शासकीय यंत्रणा, अधिकारी व नागरिकांनीही बांधकामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष द्यावे, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्राम घिवारी येथे सात लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट बंधारा, ग्राम सितुटोला येथे १५ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर दासगाव-सितुटोला-मानुटोला रस्ता डांबरीकरण, ग्राम नांद्याटोला येथे १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर जिरूटोला-नदीघाट रस्ता खडीकरण व दोन लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सभामंडप, ग्राम मुंडीपार खुर्द येथे १२ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर ग्रामपंचायत भवन, सात लाख रूपयांच्या निधीतून मंजूर आंगणवाडी इमारत व तीन लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट रस्ता बांधकामाच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे होत्या. याप्रसंगी पंचायत समिती उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, जि.प.सदस्य भोमराज चुलपार, शेखर पटले, रजनी गौतम, सिमा मडावी, माजी पं.स.सभापती स्नेहा गौतम, पं.स.सदस्य प्रमिला करचाल, अनिल मते, योगराज उपराडे, सरपंच राजू कटरे, उपसरपंच सुनिता नागपूरे, फतेलाल हनवते, मंगल सुलाखे, डॉ. चैनलाल रणगिरे, मनिराम गराडे, राजकुमार गणगिरे व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)