शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने केला जनतेचा भ्रमनिरास

By admin | Updated: October 7, 2014 23:36 IST

लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाने केलेल्या खोट्या प्रचाराला मतदार बंधू-भगिनी बळी पडल्याने आपणाला पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीनंतर या क्षेत्रातील विजयी उमेदवाराने

पटेलांचे आवाहन : विकास कामांना गती देण्यासाठी कौल द्यागोंदिया: लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाने केलेल्या खोट्या प्रचाराला मतदार बंधू-भगिनी बळी पडल्याने आपणाला पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीनंतर या क्षेत्रातील विजयी उमेदवाराने विकासाची कामे तर केली नाहीच. परंतु त्यांचे दर्शनच दुर्लभ झाल्याने जनतेमध्ये आता विकासाच्या बाबतीत निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. माझ्या मंत्रिपदाच्या काळात मंजूर झालेल्या विकास कामांना गती प्रदान करण्यासाठी आपण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करून माझे हात बळकट करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी केले.लोकसभा निवडणुकीनंतरच्या कालावधीत आपण ज्या-ज्या ठिकाणी फिरलो; जे मतदार, नागरिक मला भेटले. त्यांनी विकासाला खिळ बसल्याची भावना बोलून दाखविली. मी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव प्रयत्न केले आणि पुढे करीत राहणार असेही पटेल म्हणाले. गोंदिया विधानसभा मतदार संघात राकाँ उमेदवाराच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, टीव्हीवरून दाखविल्या जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या भूलथापांना बळी न पडता आपल्या सामान्यातून पुढे आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजयी करून विकासाला साथ द्या, असेही आवाहन पटेल यांनी केले. सभेत मंचावर उमेदवार अशोक (गप्पू) गुप्ता, तालुका अध्यक्ष कुंदन कटारे, जि.प. सदस्य नरेंद्र तुरकर, जि.प. सदस्य उषा बरडे, सेवादलचे अध्यक्ष गणेश बरडे, प्रकाश देवाधारी, सुरपत खैरवार, सरपंच सरिता चव्हाण, चुनेश पटले व इतर मान्यवर उपस्थित होते.