शेतकऱ्यांवर येणार सरकारी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:36 IST2021-09-16T04:36:28+5:302021-09-16T04:36:28+5:30

‘ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांना त्यांनी लागवड केलेल्या पिकाची नोंद करावयाची आहे, तर ही नोंद सातबारा अभिलेखावर असताना, अनेक शेतकऱ्यांकडे ...

Government crisis will come upon the farmers | शेतकऱ्यांवर येणार सरकारी संकट

शेतकऱ्यांवर येणार सरकारी संकट

‘ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांना त्यांनी लागवड केलेल्या पिकाची नोंद करावयाची आहे, तर ही नोंद सातबारा अभिलेखावर असताना, अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाही, तर काहींना त्यातील काहीच कळत नाही. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंदणी करण्यापासून मुकावे लागणार आहे. विशेषत: शेतकऱ्यांना हे सर्व करायचे आहे, तर तलाठी कशासाठी आहेत?

- मुकेश अग्रवाल, माजी उपसरपंच, तुमसर.

...........

‘शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाचा पेरा केला आहे किंवा केला नाही, याची माहिती शासन ई-पीकपेरा या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ग्राह्य धरेल, त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत ई-पीक पाहणी नोंदवावी व अडचण आल्यास जवळच्या कृषी विभाग अथवा तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

Web Title: Government crisis will come upon the farmers