शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध
By Admin | Updated: February 25, 2017 00:26 IST2017-02-25T00:26:58+5:302017-02-25T00:26:58+5:30
शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर सुधारण्यासाठी विविध योजना आणत केंद्र सरकारने कृषी बजेट मांडला.

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध
नाना पटोले : खराडी येथे खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन
खरबी (नाका) : शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर सुधारण्यासाठी विविध योजना आणत केंद्र सरकारने कृषी बजेट मांडला. यावर्षी भारत सरकारने १० लाख कोटी रूपये नाबार्ड बँकेला देऊन शेतकऱ्यांच्या विकासासाठी मदत केली, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. खराडी येथील जय बजरंगबली क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित खुल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
यावेळी मंचावर जवाहरनगरचे ठाणेदार वाय.एस. किचक, जिल्हा परिषद सदस्य प्रेम वनवे, चंद्रप्रकाश दुरुगकर, आकाश कोरे, पंचायत समिती सदस्य अमीत वसानी, माजी जिल्हा परिषद सदस्या निता आकरे, सरपंच संजय हिवसे, गोवरीचे उपसरपंच अंकीत वाडीभस्मे, राजेदहेगावचे सरपंच रामचंद्र लेंडे, रवि आगाशे, सुमीत गिऱ्हेपुंजे, ग्रामपंचायत सदस्या माया हिवसे, रविता वरखडे, दुर्वास हिवसे उपस्थित होते.
यावेळी नाना पटोले म्हणाले, खराडी या गावाशी माझे नाते आहे. या गावाने मला १०० टक्के मतदान केले होते. या गावातील समस्या पूर्ण करणार आहे. वाय.एस. किचक म्हणाले, कबड्डी खेळामुळे आज अनेक मुलांचे भविष्य उज्ज्वल होत आहे. अनेक खेळाडू नोकरीवर लागत आहेत. प्रेम वनवे म्हणाले, खराडी या गावाच्या विकासासाठी मी जिल्हा परिषदेतर्फे हे गाव दत्तक घेतले असून या गावाच्या विकासाची जबाबदारी घेत आहे.
या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या विविध योजनांचे प्रात्यक्षिक कला पथकातून मांडण्यात आले. या मध्ये बेटी पढाओ, बेटी बचाव, स्वच्छता अभियान, हागनदारीमुक्त गाव, सुकन्या योजना, पिक विमा योजना, घरकुल योजना, जनधन योजना, प्रधानमंत्री विमा योजना अशा अनेक योजनांचे प्रात्यक्षिक व माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन पुंडलीक हिवसे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चैतराम हिवसे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
प्रास्ताविक सरपंच संजय हिवसे यांनी केले. संचालन चंद्रकांत मोथरकर, आभारप्रदर्शन पुंडलीक हिवसे यांनी केले. कार्यक्रमासाठी दिपक बांगर, राकेश कारेमोरे, पंकज कारेमोरे, गुंडेराव हिवसे, विजय हिवसे व समस्त गावकरी व जय बजरंग क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी केले. (वार्ताहर)