पुष्पनगर मार्गावरील पुलास शासनाची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST2021-07-01T04:21:09+5:302021-07-01T04:21:09+5:30

ग्राम पुष्पनगर अ ते पुष्पनगर ब या दोन्ही गावांच्या मध्यभागातून वाहणाऱ्या गाढवी नदीमुळे पुलाअभावी पावसाळ्यात दोन्ही गावांचा संपर्क ...

Government approval for bridge on Pushpanagar road | पुष्पनगर मार्गावरील पुलास शासनाची मंजुरी

पुष्पनगर मार्गावरील पुलास शासनाची मंजुरी

ग्राम पुष्पनगर अ ते पुष्पनगर ब या दोन्ही गावांच्या मध्यभागातून वाहणाऱ्या गाढवी नदीमुळे पुलाअभावी पावसाळ्यात दोन्ही गावांचा संपर्क तुटून अनेक अडचणींचा येथे राहणाऱ्या बंगाली बांधवांना सामना करावा लागत असे. बऱ्याच दिवसांपासून या पुलाच्या निर्मितीची मागणी होत होती; परंतु शासन या पुलाच्या निर्मितीकडे दुर्लक्ष करीत आहे. युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश नाकाडे यांनी बंगाली वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची अडचण लक्षात घेऊन खासदार प्रफुल्ल पटेल आणि मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे, त्यांच्या प्रयत्नांमुळे पुष्पनगर अ ते पुष्पनगर ब या दरम्यान वाहणाऱ्या नदीवर ६० मीटर पुलाचे बांधकाम करण्यास मंजुरी दिली आहे. या पुलाअभावी पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे ठप्प राहत होती. आता पुलाचे बांधकाम होणार असल्याने ही समस्या मार्गी लागली आहे.

Web Title: Government approval for bridge on Pushpanagar road